काय चाललंय IPLमध्ये? कुलदीप यादवनं रिंकूला भर मैदानात लगावलं चापट! पाहा VIDEO

आयपीएल 2025 मधील 48व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने सामने होते. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. पण या चुरशीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. केकेआरने हा सामना 14 धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यात रिंकू सिंग आणि कुलदीप यादव गंमत (चेष्टा-मस्करी) करताना दिसत आहेत.

व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसत आहे की, सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू गप्पा मारण्यासाठी मैदानावर जमले. कुलदीप यादव आणि रिंकू सिंग देखील एकत्र बोलत होते. त्यानंतर कुलदीप यादवने गंमतीने रिंकू सिंगला थप्पड मारली. थप्पड मारल्यानंतर, रिंकू सिंग थोडा रागावलेला दिसत होता आणि काहीतरी बोलतानाही दिसला.

पाहा व्हिडिओ-

या आयपीएल हंगामात रिंकू सिंगने निराशा केली आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात त्याने 25 चेंडूत 36 धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि एक षटकार मारला. ज्यात त्याचा स्ट्राइक रेट 144 होता. रिंकूची या हंगामात कामगिरी निराशाजनक राहिली आहे. मेगा लिलावापूर्वी त्याला केकेआरने कायम ठेवले होते. हंगामाच्या 10 सामन्यांमध्ये त्याने 33.80 च्या सरासरीने आणि 145.68 च्या स्ट्राइक रेटने 169 धावा केल्या आहेत.

Comments are closed.