महिला कॉन्स्टेबलला कॉल करत हार्ट इमोजीसह पाठवला आक्षेपार्ह फोटो, पोलीस निरिक्षकावर विनयभंगाचा
छत्रपती संभाजीनगर गुन्हा: छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय .एका महिला कॉन्स्टेबलला व्हाट्सअपवर कॉल करून हार्ट इमोजी पाठवणाऱ्या पोलीस निरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .या अधिकाऱ्याने महिला कॉन्स्टेबलला स्वतःचा हाफ जॅकेट घातलेला फोटो पाठवल्याने महिलेने पोलीस निरीक्षक विरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली .शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्यातून ही घटना समोर आल्याने पोलीस खात्यातही खळबळ उडाली आहे . एखादा पोलीस निरीक्षकच महिला कॉन्स्टेबलसोबत आक्षेपार्ह प्रकारे संपर्क करत असेल तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे दाद मागायची ?असा सवालही उपस्थित केला जातोय . (Crime News)
नक्की झाले काय?
छत्रपती संभाजीनगर शहरातील बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस निरीक्षकाने महिला कॉन्स्टेबल घरी जात असताना व्हाट्सअपवर कॉल करून लाल रंगाचे हार्ट ईमोजी पाठवले .त्यासोबत स्वतःचा हाफ जॅकेट घातलेला आक्षेपार्ह फोटो पाठवून महिलेला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याचं FIRमध्ये म्हटलं आहे . बेगमपुरा पोलीस ठाण्यातच कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलने पोलीस निरीक्षकावर तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी पोलीस निरीक्षकावर बीएनएस कलम 78 (2 ) प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तक्रार गुन्हा दाखल केलाय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिला पोलिस अंमलदाराने पोलिस निरीक्षकाविरुद्ध विनयभंगाची तक्रार दाखल केली आहे.ही 34 वर्षीय महिला कॉन्स्टेबल 9 एप्रिलच्या रात्री ती घरी जात असताना रात्री 10.22 ते 11.23 या वेळेत पोलिस निरीक्षक अशोक भंडारी यांनी तिच्या व्हॉट्सअॅपवर कॉल केला.त्यानंतर त्यांनी स्वतःचा हाफ जॅकेट घातलेला फोटो तिला पाठवला. या प्रकारामुळे संबंधित महिलेला लज्जा वाटल्याचे तिने तक्रारीत म्हटले आहे. अशोक भंडारे असं गुन्हा दाखल झालेल्या पोलीस निरीक्षकांचं नाव आहे. त्यांच्यावर बेगमपुरा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. पण महिलेनं केलेले सर्व आरोप पोलीस अधिकाऱ्याने फेटाळून लावले आहेत.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.