गैरसमज सोडा! कुलदीप आणि रिंकू तर जिगरी दोस्त, मैत्रीचा व्हिडीओ व्हायरल
आयपीएल 2025 (Indian Premier League) मधील 48व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (DC vs KKR) संघ आमने सामने होते. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच अरण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. पण या अटीतटीच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. केकेआरने हा सामना 14 धावांनी जिंकला. सामना संपल्यानंतरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यात रिंकू सिंग (Rinku Singh) आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) गंमत (चेष्टा-मस्करी) करताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये दिसत आहे की, सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू गप्पा मारण्यासाठी मैदानावर जमले. कुलदीप यादव आणि रिंकू सिंग देखील एकत्र बोलत होते. त्यानंतर कुलदीप यादवने गंमतीने रिंकू सिंगला चापट मारली. चापट मारल्यानंतर, रिंकू सिंग थोडा रागावलेला दिसत होता आणि काहीतरी बोलतानाही दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरला झाला. कुलदीपने रागाने रिंकूला चापट मारली याच्या बातम्या व्हायरल होत होत्या.
पण व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर केकेआरने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून रिंकू आणि कुलदीपच्या मैत्रीचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन्ही खेळाडूंचे सोबत क्रिकेट खेळलेले फोटो शेअर केले आहेत. व्हिडीओच्या सुरूवातीला कुलदीप आणि रिंकू म्हणत आहेत की एवढ्या छोट्याशा गोष्टीला मीडियाने एवढे मोठे केले.
Comments are closed.