पाकच्या सीमावार्ती गावातील मशि‍दीतून अजानचा आवाज येणं बंद, कारगिल युद्धानंतर पहिल्यांदा शांतता

काश्मीर दहशतवादी हल्ला: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिलला दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या भ्याड हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारत सरकारनं आक्रमक पावलं उचलत मोठे निर्णय घेतले आहेत. भारतानं सिंधू जल करार स्थगित केला आहे. या शिवाय पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जाण्यास सांगण्यात आलं. पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले. मात्र, भारत अजून आक्रमकपणे उत्तर देईल अशी पाकिस्तानला भीती वाटत आहे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सैन्य दलांना फ्री हँड देण्यात आला आहे. त्यामुळं पाकिस्तानमधील सीमावर्ती भागातील गावांमधी भीतीचं वातावरण असल्याचं दिसून येत आहे.

भारत पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जम्मूच्या आर.एस. पुरा सेक्टरमध्ये शेवटचं गाव सुचेतगड आहे. या  गावात भारतीय शेतकरी सुगीच्या कामात व्यस्त आहेत. दुसरीकडे पाकिस्तानच्या बाजूला असलेल्या गावात शांतता आहे. पाकिस्तानच्या भागात कोणतीही हालचाल दिसत नाही, ना शेतामध्ये कोणती काम होत आहे. लष्करी कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानच्या सीमेकडील भाग निर्मनुष्य झाले आहेत.

पाकिस्तानच्या मशिदीतून अजाण आवाज येणं पहिल्यांदा बंद

सुचेतगडमधील स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानच्या सीमेकडील भागात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु होत्या. तिकडचे शेतकरी त्यांच्या शेतात नियमित पणे काम करायचे. त्यांच्याकडील पाळीव प्राणी भारतीय सीमेजवळ आणायचे. आता परिस्थिती बदलली आहे. गावच्या सरपंचांनी सांगितलं की आम्ही पहिल्यांदा पाहतोय की पाकिस्तानच्या मशिदीतून अजाण आवाज येणं बंद झालं आहे. यापूर्वी कारगिल युद्धावेळी तसं झालं होतं.

गावकऱ्यांच्या माहितीनुसार आर एस पुरा सेक्टरच्या बरोबर समोर पाकिस्तानचं सियालकोट हे क्षेत्र आहे. सुचेतगड पासून ते काही किलोमीटर अंतरावर आहे. या क्षेत्रात कजरियल, ऊंची बैंस, कसीरे आणि गूंग यासारखी गावं ओसाड पडली आहेत.

पाकिस्तानकडून टेहळणी सुरु

पाकिस्तानच्या रेंजर्सकडून वॉच टॉवर्सवरुन भारतीय  क्षेत्राची पाहणी केली जातेय, असं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं. पाकिस्तानी रेंजर्सकडून टेहळणी होतेय मात्र सार्वजनिक हालचाली होत नाहीत. स्थानिक लोक कुणी घुसखोरी करु नये यासाठी सतर्क आहेत. सीमावर्ती गावांमध्ये सतर्कता वाढवण्यात आली आहे.

आर.एस. पुराच्या ग्रामीण भागातील लोक भारत सरकारच्या सोबत पूर्णपणे आहेत. पाकिस्तानला त्यांच्या कृत्याची शिक्षा देण्याती वेळ आली आहे. आम्हाला शांती पाहिजे मात्र, जेव्हा आमच्या नागरिकांवर हल्ला होतो तेव्हा शांत राहणं शक्य नाही.

पाकिस्तानच्या सीमावर्ती गावातील स्थिती?

https://www.youtube.com/watch?v=4odopgcgmak

अधिक पाहा..

Comments are closed.