CSK vs PBKS: श्रेयस अय्यरने जिंकला टाॅस! चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण, पहा दोन्ही संघांच्या प्लेइंग 11

आयपीएल 2025 मधील 49व्या सामन्यात आज (30 एप्रिल) रोजी एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज आणि श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाब किंग्ज संघ आमने-सामने आहेत. (CSK vs PBKS) दोन्ही संघ चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर भिडणार आहेत. दरम्यान दोन्ही संघात अटीतटीची लढत पाहायला मिळेल. तत्पूर्वी या सामन्याचा टाॅस जिंकून पंजाबने गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

दोन्ही संघांच्या प्लेइंग 11-

चेन्नई सुपर किंग्ज- शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

इम्पॅक्ट प्लेयर- अंशुल कंबोज, रविचंद्रन अश्विन, कमलेश नागर्कोटी, रामकृष्ण घोष, जेमी ओव्हहार्टन

पंजाब किंग्ज- प्रियणश आर्य, श्रेयस अय्यर (कर्नाधर), जोश इंग्लिश (यशर रक्ष), नेहल वधेरा, शशंक सिंग, हरप्रीत ब्रार, मार्को जानसेन, अजमतुल्ला ओमार्जाई, सूर्यश शेज, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेयर- प्रभासिम्रान सिंग, मुशिर खान, विजयकुमार विश्वक, झेव्हियर बार्टलेट, प्रवीण दुबे

यंदाच्या आयपीएलमध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाबची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. संघाने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 9 पैकी 5 सामन्यात विजय मिळवले आहेत. तर 3 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि 1 सामना बरोबरीत सुटला. पंजाब 11 गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. दरम्यान आजचा सामना जिंकून पंजाब प्लेऑफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्याचा प्रयत्न करेल.

दुसरीकडे एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब राहिली आहे. संघाने आतापर्यंत खेळल्या गेलल्या 9 सामन्यांपैकी 2 सामने जिंकले आहेत, तर 7 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. सीएसके 4 गुणांसह गुणतालिकेत दहाव्या स्थानी आहे. संघाचा यंदाच्या आयपीएल हंगामातील प्रवास जवळपास संपला आहे.

Comments are closed.