CSK vs PBKS: सॅम करनचे दमदार अर्धशतक! चेन्नईने पंजाबसमोर उभारला 191 धावांचा डोंगर

यंदाच्या आयपीएल हंगामातील 49वा सामना आज (30 एप्रिल) चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला जात आहे. यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील पंजाबने टाॅस जिंकून चेन्नईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. दरम्यान चेन्नईने 10 विकेट्स गमावून पंजाबसमोर जिंकण्यासाठी 191 धावांचे आव्हान ठेवले आहे.

चेन्नईसाठी शेख रशीद आणि आयुष म्हात्रे यांनी सलामी दिली. पण दोन्ही फलंदाज संघाला चांगली सुरूवात करून देऊ शकले नाहीत. दोघंही अनुक्रमे 11 आणि 7 अशा धावसंख्येवर बाद झाले. त्यानंतर डावखुरा फलंदाज सॅम करनने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि जबरदस्त अर्धशतक झळकावले. करनने 47 चेंडूत 88 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 9 चौकारांसह 4 गगनचुंबी षटकार ठोकले. रवींद्र जडेजा 17 आणि डेवाल्ड ब्रेविस 32 धावा यांच्या जोरावर चेन्नईचा संघ 190 धावा करण्यात यशस्वी ठरला.

पंजाबसाठी स्टार फिरकीपटू युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आपल्या फिरकीची जादू दाखवली. त्याने 32 धावा देऊन सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. चहलने 19व्या षटकात विकेट्सची हॅट्रीक केली. त्यानंतर वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि मार्को जॅनसेन यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर अझमतुल्लाह ओमरझाई आणि हरप्रीत ब्रार यांनी 1-1 विकेट आपल्या नावावर केली.

दोन्ही संघाच्या प्लेइंग 11-

चेन्नई सुपर किंग्ज- शेख रशीद, आयुष म्हात्रे, सॅम करन, रवींद्र जडेजा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, दीपक हुडा, एमएस धोनी (यष्टीरक्षक/कर्णधार), नूर अहमद, खलील अहमद, मथीशा पाथिराना

इम्पॅक्ट प्लेयर- अंशुल कंबोज, रविचंद्रन अश्विन, कमलेश नागर्कोटी, रामकृष्ण घोष, जेमी ओव्हहार्टन

पंजाब किंग्ज- प्रियणश आर्य, श्रेयस अय्यर (कर्नाधर), जोश इंग्लिश (यशर रक्ष), नेहल वधेरा, शशंक सिंग, हरप्रीत ब्रार, मार्को जानसेन, अजमतुल्ला ओमार्जाई, सूर्यश शेज, युझवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेयर- प्रभासिम्रान सिंग, मुशिर खान, विजयकुमार विश्वक, झेव्हियर बार्टलेट, प्रवीण दुबे

Comments are closed.