कॅप्टन 'अय्यर'ची मॅच विनिंग खेळी, पंजाबनं चेन्नईला चेपाॅकमध्ये हरवलं
आयपीएल 2025च्या 49व्या सामन्यात पंजाब किंग्जने चेन्नई सुपर किंग्जचा 4 विकेट्सने पराभव केला. पंजाबच्या विजयाचे हिरो लेग-स्पिनर युझवेंद्र चहल आणि कर्णधार श्रेयस अय्यर होते. चहलने गोलंदाजीत हॅट्ट्रिक घेत चमत्कार केले त्यानंतर अय्यरने चेन्नईच्या गोलंदाजांना धुतले. या पराभवासह, चेन्नई आयपीएल 2025 मधून बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे.
सीएसके पहिल्या डावात खेळताना सॅम करनच्या 88 धावांच्या खेळीमुळे 190 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. पंजाबकडून कर्णधार श्रेयस अय्यरने चमकदार खेळी खेळली. त्याने 41 चेंडूत 72 धावांची शानदार खेळी खेळली. ज्यात त्याने 5 चाैकार व 4 षटकार मारले. श्रेयस अय्यरच्या या मॅच विनिंग खेळीमुळे पंजाब किंग्जने 4 विकेट्सने सामना जिंकला. सलामीवीर प्रभसिमरन सिंगनेही (54) अर्धशतक झळकावले. सलग दुसऱ्यांदा चेन्नई सुपर किंग्ज संघ प्लेऑफमध्ये पात्र ठरू शकलेला नाही.
जमिनीवर खाली उतरले! 💪🏏
6, 6, डब्ल्यूडी, 4 – #Shreyasiyer घाईघाईने ते पूर्ण करायचे आहे! कर्णधार पूर्ण थ्रॉटल जात आहे!
थेट क्रिया पहा ➡ https://t.co/kxcjo6jcji #लिप्लॉनजिओस्टार 👉 #Cskvpbks | स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी आणि जिओहोटस्टारवर आता लाइव्ह करा! pic.twitter.com/bu1xpneap8
– स्टार स्पोर्ट्स (@स्टार्सपोर्टसिंडिया) 30 एप्रिल, 2025
चेन्नईने दिलेल्या 191 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने दमदार खेळी केली. प्रियांश आर्य (23) आणि प्रभसिमरन सिंग (54) यांनी चांगली सुरुवात दिली. त्यानंतर श्रेयस अय्यरने आक्रमक फलंदाजी करत 41 चेंडूत 72 धावा केल्या. शशांक सिंगनेही 12 चेंडूत महत्त्वाच्या 22 धावा करत साथ दिली. अय्यर बाद झाल्यानंतर मार्को जानसेनने विजयी चौकार मारत सामना संपवला. पंजाबने हा सामना सहज जिंकला.
Comments are closed.