Maharashtra government 100 days report Devendra Fadnavis progress report Maharashtra government achievements


मुंबई : राज्य सरकारकडून 7 जानेवारी 2025 रोजी 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यामधून प्रशासनाला शिस्तीचे धडे मिळावेत हा त्या मागचा उद्देश होता. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात आला. या 100 दिवसांच्या कृती आराखड्याचा निकाल अर्थात प्रगती पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर शेअर केले आहे. या यादीत एकूण राज्यातील ४८ विभागांच्या प्रगतीचा आढावा देण्यात आला आहे. ज्यामध्ये महिला व बालविकास खातं आघाडीवर असून सार्वजनिक बांधकाम विकास दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं समोर आलं आहे. (Maharashtra government 100 days report Devendra Fadnavis progress report Maharashtra government achievements )

राज्य सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यकालीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महायुती सरकारचे प्रगती पुस्तक सर्वसामान्य जनतेसमोर मांडले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत याबद्दलची माहिती दिली आहे. यात त्यांनी कोणते विभाग अव्वल स्थानावर, कोणाची किती टक्के कामे पूर्ण झाली आहेत, याबद्दलची माहिती सांगितली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

”राज्यात नवीन महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर शासनाच्या सर्व 48 विभागांनी 100 दिवसांचा धोरणात्मक बाबींचा कार्यक्रम हाती घेऊन महत्त्वाची नवीन धोरणे, दूरगामी निर्णय व लोकाभिमुख उपक्रमांची आखणी सुरू केली. गेल्या 100 दिवसात या सर्व विभागांनी निश्चित केलेल्या 902 धोरणात्मक उद्दिष्टांपैकी 706 उद्दिष्टे (78%) पूर्णतः साध्य केली आहेत तर उर्वरित 196 उद्दिष्टे पूर्ण होईपर्यंत संबंधित विभाग आपले काम चालूच ठेवतील. एकूण 48 विभागांपैकी 12 विभागांनी आपली 100% उद्दिष्ट पूर्तता केली आहे तर आणखी 18 विभागांनी 80% पेक्षा जास्त उद्दिष्टे साध्य केली आहेत.

या परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत सर्व विभागांनी केलेल्या अतिशय प्रभावी कामगिरीबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांनी भविष्यात सुद्धा अशीच चांगली कामगिरी करावी, यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो”, असे देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

याशिवाय, 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे….

  • 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,
  • 5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त,
  • 5 जिल्हाधिकारी,
  • 5 पोलिस अधीक्षक,
  • 5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.),
  • 4 महापालिका आयुक्त,
  • 3 पोलिस आयुक्त,
  • 2 विभागीय आयुक्त आणि
  • 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक

यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे. या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो, असेही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर

  • आदिती तटकरे यांच्या महिला आणि बालविकास विभागला 80 टक्के गुण मिळाले आहेत.
  • सार्वजनिक बांधकाम विभाग 77.95 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांकावरती आहे.
  • माणिकराव कोकाटेंच्या कृषी विभाग 66.15 टक्के गुण मिळाले आहेत.
  • ग्रामविकास विभाग चौथ्या तर परिवहन व बंदरे विभाग पाचव्या स्थानी आहे.

सरकारच्या 100 दिवसांत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी सर्वोत्तम

  • चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना 100 पैकी 84.29 टक्के गुण
  • कोल्हापूरचे जिल्हाधिकारी 81.14 टक्के गुणांसह द्वितीय
  • जळगावचे जिल्हाधिकारी 80.86 टक्के गुणांसह तृतीय स्थानी
  • अकोल्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना चौथ्या क्रमांकाचे 78.86 टक्के गुण
  • नांदेडचे जिल्हाधिकारी पाचव्या क्रमांकावर,66.86 टक्के गुण

पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम

  • 100 दिवसांच्या कामांत पालघर पोलीस अधीक्षकांना 90.29% गुण
  • नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक द्वितीय स्थानी
  • नागपूर ग्रामीण आणि गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकांना 80 टक्के गुण
  • जळगावचे पोलीस अधीक्षक 65.71 टक्के गुणांसह चौथ्या स्थानी
  • सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक 64 टक्के गुणांसह पाचव्या स्थानी

हेही वाचा – Sanjay Raut : एक टेकाडा आणि दोन टेंगूळ; राऊतांची फडणवीसांसह शिंदे-पवारांवर टीका



Source link

Comments are closed.