चिली आणि अर्जेंटिनामध्ये 7.4 तीव्रतेचा भूकंप, देशात त्सुनामीचा अलर्ट

चिली आणि अर्जेंटिनामध्ये 7.4 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यूएसजीएसने दिलेल्या वृत्तानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू चिली आणि अर्जेंटिनाच्या दक्षिण किनाऱ्याजवळील समुद्रात होता. आतापर्यंत जीवित किंवा मालमत्तेच्या नुकसानीचे कोणते ही वृत्त नाही. परंतु अधिकाऱ्यांनी लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. परंतु काही वेळाने तो मागे घेण्यात आला. स्थानिक माध्यमांनुसार, चिलीतील पुंता एरेनास आणि अर्जेंटिनामधील रिओ गॅलेगोस या शहरांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. चिली आणि अर्जेंटिनामध्ये भूकंपाचे धक्के जाणवत असतात. कारण ते रिंग ऑफ फायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात आहेत, जिथे पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्स एकमेकांवर आदळतात आणि वारंवार भूकंप होतात.

Comments are closed.