पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यास सांगितलं, मग सीमा हैदरचं काय? आमदाराची मोठी मागणी

सीमा हैदर वर अबू आझमी: समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Samajwadi Party Leader Abu Azmi) बोलताना म्हणाले की, पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack), एकीकडे भारत सरकारनं (Government of India) पाकिस्तानी नागरिकांना (Pakistani Nationals) देश सोडण्यास सांगितलं आहे, तर दुसरीकडे सर्वाधिक चर्चेत असलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदर (Pakistani Citizen Seema Haider) हिच्या भारतात उपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सीमा हैदर (Seema Haider), जी एका ऑनलाईन गेमद्वारे भारतात राहणाऱ्या सचिनच्या संपर्कात आली आणि नंतर नेपाळमार्गे भारतात पोहोचली. सीमा आणि सचिनची प्रेम कहाणी प्रचंड व्हायरल झालेली. अशातच आता या मुद्द्यावर समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी सरकारला घेरलं आहे. तसेच, पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिल्यानंतरही सीमा हैदर भारतात कशी? असाही सवाल अबू आझमी (Abu Azmi) यांनी उपस्थित केला आहे.

पहलगामा हल्ल्यानंतर भारत सरकारकडून सर्व पाकिस्तानी नागरिकांना भारतातून जाण्यास सांगण्यात आलं. असं असताना पाकिस्तानमधून आलेली सीमा हैदर हिला देखील पाकिस्तानमध्ये लवकरात लवकर पाठवण्यात यावं, अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी भारत सरकारकडे केली आहे.

सीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा : अबू आझमी

न्यूज एजन्सी आयएएनएसशी बोलताना अबू आझमी यांनी कठोर शब्दांत लिहिलंय की, “जर सर्व पाकिस्तानींना परत पाठवलं जात असेल, तर सीमा हैदरला का वगळण्यात आलं? आमची मागणी अशी आहे की, तिलाही लवकरात लवकर पाकिस्तानात परत पाठवावं.” तसेच, पुढे बोलताना अबू आझमी यांनी सरकारला विचारलं की, जर इतर लोकांचे व्हिसा रद्द केले जात असतील, तर सीमा हैदरवर हा नियम का लागू केला गेला नाही?

अबू आझमी यांनी सीमा हैदरबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले की, “सरकारंच पुढाकार घेऊन तिला परत का पाठवत नाही? सरकारनं हे स्पष्ट करावं. जर कायदा सर्वांसाठी समान आहे, तर सीमा हैदर अपवाद का?

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत, हे उल्लेखनीय आहे. केंद्र सरकारनं सर्व पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करून त्यांना परत पाकिस्तानात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि गुप्तचर संस्थांच्या शिफारशींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सीमा हैदर नेमकी आहे तरी कोण?

सीमा हैदरचा इतिहास सध्या तिच्याबाबत सुरू असलेल्या वादाला आणखी चिघळवतो. सीमा ही मूळची एक पाकिस्तानी महिला आहे, जी नेपाळमार्गे भारतात आली होती. असं म्हटलं जात होतं की, ती भारतातील ग्रेटर नोएडा येथील रहिवासी सचिनवर प्रेम करत होती आणि त्याच्यासाठीच ती मोठा खटाटोप करुन पाकिस्तानहून भारतात पळून आली. वैध व्हिसा आणि परवानगीशिवाय देशात प्रवेश करूनही, सीमा हैदरला सध्या भारतात राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अशातच आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी यावरुन कठोर प्रश्न उपस्थित केल्यामुळे सरकार काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडीओ : Abu Azmi On Seema Haider : सिमा हैदरला पाकिस्तानमध्ये लवकरात लवकर पाठवा, अबू आझमींची मागणी

https://www.youtube.com/watch?v=qeaz6mwqq4M

अधिक पाहा..

Comments are closed.