Ajit Pawar’s statement that the loan waiver announcement is an election gimmick


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले आहे का? नाही ना…, असे म्हणत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात वर केले होते. अशातच आज (03 मे) त्यांनी अजित पवार यांनी निवडणुकीच्या वेळी लोकांना आपल्याकडे वळवण्याकरता किंवा आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावं, यासाठी आकर्षित करण्याकरता अशा गोष्टी कराव्या लागतात, असे वक्तव्य केले आहे.

मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासन माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र महायुती सरकारला आता चार महिने पूर्ण झाले तरी अद्यापही कर्जमाफीबाबत घोषणा होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकार कर्जमाफी कधी करणार? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र शुक्रवारी (02 मे) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन मी दिले आहे का? नाही ना…, असे म्हणत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून हात वर केले होते. अशातच आज (03 मे) त्यांनी अजित पवार यांनी निवडणुकीच्या वेळी लोकांना आपल्याकडे वळवण्याकरता किंवा आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावं, यासाठी आकर्षित करण्याकरता अशा गोष्टी कराव्या लागतात, असे वक्तव्य केले आहे. (Ajit Pawar’s statement that the loan waiver announcement is an election gimmick)

माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांना पुन्हा एकदा कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, आम्हाला राज्य चालवायचं आहे. तुम्ही लोकांनी आतापर्यंतच्या वेगवेगळ्या निवडणुकीमधील सगळे कार्यक्रम काढा. एकदा तर आम्ही 2004 साली मोफत वीज माफी म्हणून बिलं दिली. आमचं सरकार आल्यानंतर तो निर्णय मागे घेतला गेला. कारण तो निर्णय आपल्या राज्याला आर्थिक बाबतीत परवडणारा नव्हता. शेवटी आपल्यालाही माहिती आहे की, महायुतीच्या वतीने जो काही जाहीरनामा दिला, त्यापेक्षा अधिक रक्कमेचा जाहीरनामा महाविकास आघाडीने दिला होता. तो कदापि अस्तित्वात येणे शक्य नव्हते, असा दावा अजित पवार यांनी दिला.

हेही वाचा – Politics : अजित पवार गटात जाण्याचा दावा? सुषमा अंधारे आणि अंजली दमानिया ट्विटरवर भिडल्या

अजित पवार म्हणाले की, मी अनेक वर्षे अर्थमंत्री म्हणून काम करत आहे, तेवढा भार उचलणं हे शक्य नव्हतं. पण बरेचसे राज्यकर्ते असेही करतात की, सत्तेत आल्यावर पुढे बघता येईल किंवा नंतर आपण ठरवू. पण निवडणुकीच्या वेळी लोकांना आपल्याकडे वळवण्याकरता किंवा आपल्या पक्षाच्या उमेदवारांना मतदान करावं, यासाठी आकर्षित करण्याकरता अशा गोष्टी देशपातळीवर आणि वेगवेगळ्या राज्य पातळीवर होत असतात. त्याबद्दल सगळ्यांनीच गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे. निवडणुकीच्या वेळी घोषणा केल्या जातात आणि त्यानंतर त्या घोषणा प्रत्यक्षात कृतीमध्ये आणता येत नाहीत. त्यावेळेस थोडा वेगळा निर्णय घ्यावा लागतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Prithviraj Chavan : भाजपाने भूमिका बदलल्यामुळेच…; जातनिहाय जनगणनेवर काय म्हणाले चव्हाण?



Source link

Comments are closed.