भारतातील सर्वात महाग मशरूम

श्रीमंत लोकही खाण्यापूर्वी करतील दहावेळा विचार

तुम्ही कधी बाजारात भाज्या खरेदी करण्यासाठी गेला आहात का? याचे उत्तर होय असेल तर तुम्हाला भाज्यांच्या दरांचा सर्वसाधारण अंदाज असावा. काही भाज्या महाग झाल्या तरीही त्याचा दर 100 रुपये किलोच्या आसपास असतो. परंतु तुम्ही कधी 40 हजार रुपये किलो दराने भाजी खरेदी केली आहे का? हिमालयाच्या उंच पर्वतांमध्ये अणि बर्फाने आच्छादलेल्या जंगलांमध्ये उगवणारे गुच्छी मशरुम अत्यंत महाग मानले जाते. या स्वादिष्ट मशरुमला जगातील सर्वात महाग मशरुमपैकी एक मानले जाते. याची किंमत 40 हजार रुपये प्रति किलोग्रॅमपर्यंत आहे.

गुच्छी मशरुमला शास्त्राrय भाषेत मोरशेला इस्क्यूलेंटा असे नाव आहे. हे सर्वसामान्य मशरुममध्ये उगविले जाऊ शकत नाही. हे केवळ जंगली भागांमध्ये नैसर्गिक स्वरुपात उगवते, जे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर आणि नेपाळच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये विशेष स्वरुपात आढळून येते. हे मशरुम केवळ बर्फ वितळू लागल्यावरच उगवते. या मशरुमला शोधणे सोप नसते. हे घनदाट जंगल, पाने आणि मातीखाली लपलेले असते. हे मशरुम शोधताना एखाद्या खजिन्याचा शोध घेत असल्याचे वाटू लागते. याचमुळे या मशरुमला शोधण्यासाठी स्थानिक लोक ग्रामीण आणि पर्वतीय भागांमध्ये अनेक आठवड्यांपर्यंत फिरत असतात.

जंगलातील अनमोल खजिना

हिमालयाच्या दुर्गम भागांमध्ये कित्येक तास चालून, उंच पर्वतांना पार करून आणि घनदाट जंगलांदरम्यान मशरुमचा शोध घ्यावा लागतो. अनेकदा या प्रवासात वन्यप्राणी म्हणजेच अस्वल आणि बिबट्यांना सामोरे जावे लागते. गुच्छी मशरुमला योग्यवेळी शोधून काढणे देखील आव्हान आहे. विशिष्ट प्रमाणात ओलावा नसल्यास हे मशरुम उगवत नाही. तसेच हे मशरुम तोडल्यावर ते सूर्यप्रकाशात सुकवावे लागते, जेणेकरून त्याची गुणवत्ता कायम रहावी.

शाही पक्वानांचा आधार

गुच्छी मशरुम केवळ स्वत:च्या दुर्लभतेमुळे नव्हे तर स्वत:च्या स्वादामुळे देखील खास आहेश. याला शाही बिर्याणी, पुलाव, करी आणि सूपकरता वापरले जाते. याचबरोबर इटालियन आणि फ्रेंच किचनमध्ये देखली याची मागणी अत्यंत अधिक आहे. प्रसिद्ध शेफ याला पास्ता, रिसोट्टो आणि सॉसमध्ये मिसळून याचा स्वाद वाढवितात. याचमुळे जगभरातील हॉटेल्स आणि महागड्या रेस्टॉरंटमध्ये गुच्छी मशरुमची जबरदस्त मागणी राहते.

आरोग्यासाठी उपयुक्त

हे मशरुम स्वत:च्या औषधीय गुणधर्मासाठी देखील ओळखले जाते. जुन्या काळात याला अनेक आजारांवरील उपचारासाठी वापरले जात होते, याचमुळे याची किंमत आणखी वाढत गेली. याचबरोबर गुच्छी मशरुम हे हजारो ग्रामस्थांच्या जीवनाचा सहारा देखील आहे. हिमालयीन क्षेत्रांमधील अनेक परिवार याच मशरुमला जमवून बाजारात विकतात आणि यातून त्यांचा वर्षभर उदरनिर्वाह चालतो.

Comments are closed.