मुंबईत चार महिन्यांत 52,896 घरांची विक्री, गतवर्षीच्या तुलनेत आठ टक्क्यांची वाढ

यंदाच्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या कालावधीत मुंबईत 52 हजार 896 घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 8 टक्क्यांनी वाढ झाली असून गतवर्षी याच कालावधीत 48 हजार 819 घरांची विक्री झाली होती. मुंबईतील घरांच्या विक्रीसंदर्भात रियल एस्टेट कन्सल्टंट अ‍ॅनारॉकने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. यात जागतिक मंदीचा मुंबईतील घर विक्रीवर काहीही परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे.

जानेवारी ते एप्रिलमध्ये 52 हजार 896 घरांची विक्री झाली असून त्यापैकी सर्वाधिक म्हणजे 15 हजार 501 घरे मार्च महिन्यात विकली गेली आहेत. एप्रिल महिन्यात 13 हजार 80 घरांची विक्री झाली असून गतवर्षी याच कालावधीत 11 हजार 648 घरांची विक्री झाली होती.

शासनाला 4633 कोटींचा महसूल

घरांच्या नोंदणीतून राज्य शासनाच्या नोंदणी आणि मुद्रांक विभागाला चार महिन्यात 4633 कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत 21 टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत घरांच्या विक्रीतून 3836 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.

Comments are closed.