इम्रान खान, बिलावल भुट्टो वर डिजिटल स्ट्राइक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्यानंतर पाकिस्तानचे नेते सातत्याने भारताच्या विरोधात गरळ ओकत होते. आता भारत सरकारने याप्रकरणी कारवाई करत त्यांच्या एक्स हँडलला भारतात ब्लॉक करविले आहे. याचबरोबर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हँडलवरही बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी अनेक पाकिस्तानी इन्स्टाग्राम अकौंट्स ज्यात हानिया आमिर, माहिरा खान, अली जफर यांच्या अकौंट्सवर भारतात बंदी घालण्यात आली होती. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे युट्यूब चॅनेलही भारतात रोखण्यात आले आहे.

भारतविरोधी आणि चिथावणीपूर्ण सामग्री फैलावण्याचा आरोप असलेलया 16 पाकिस्तानी युट्यूब चॅनेल्सवर बंदी घालण्यात आली आहे. बिलावर भुट्टो यांनी सिंधू नदीचे पाणी रोखल्यास रक्त वाहणार अशी धमकी भारताला दिली होती. तर पाकिस्तानच्या तुरुंगात कैद इम्रान खान यांनी भारताला धमकी दिली होती.

Comments are closed.