सिंग इज किंग! प्रभसिमरनची अर्धशतकी खेळी, पंजाबनं लखनऊला लोळवलं

आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील 54व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सचा 37 धावांनी पराभव केला. पंजाबने पहिल्या डावात खेळताना 236 धावा केल्या, ज्याला प्रत्युत्तर म्हणून लखनऊ संघ निर्धारित 20 षटकांत फक्त 199 धावा करू शकला. आशाप्रकारे सामना 37 धावांनी गमावला. पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंगने 91 धावांची तुफानी खेळी खेळली.

धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, टाॅस गमावून पहिल्यांदा खेळताना पंजाब किंग्जने 236 धावांचा मोठा स्कोअर केला. ज्यामध्ये प्रभसिमरन सिंगने चमकदार कामगिरी केली. संघाला पहिलाच धक्का 2 धावांवर बसला, प्रियांश आर्य केवळ 1 धाव करुन माघारी परतला. यानंतर प्रभसिमरनने जबाबदारी स्वीकारली. त्याने 91 धावांची खेळी करत संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहचवले, त्याच्या खेळीत त्याने 6 चाैकार व 7 षटकार मारल्या.

लक्ष्याचा पाठलाग करताना लखनऊची सुरुवात खराब झाली, दोन्ही सलामीवीर 16 धावांत बाद झाले. मार्कराम (13) आणि मार्श (0) अपयशी ठरले. पूरन सलग पाचव्या सामन्यात फ्लॉप गेला (6), तर कर्णधार रिषभ पंतही फॉर्ममध्ये नव्हता (18). एकेकाळी संघ 73 धावांवर 5 विकेट्स गमावल्या होत्या, पण अब्दुल समद (45) आणि आयुष बदोनी (74) यांनी 81 धावांची भागीदारी करत संघ सावरला, पण त्यांना विजय खेचून आणता आले नाही.

प्रभसिमरन सिंग आणि अर्शदीप सिंग यांनी पंजाबच्या विजयात सर्वात मोठे योगदान दिले. प्रभसिमरनने फलंदाजीत 91 धावांची खेळी केली आणि पंजाबला 236 धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. अर्शदीप सिंगने 3 बळी घेतले. या विजयासह पंजाब 15 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आला आहे.

Comments are closed.