PBKS vs LSG: 'हा' ठरला पंजाबच्या विजयाचा टर्निंग पाँईंट

आयपीएल 2025च्या 54व्या सामन्यात पंजाब किंग्जने लखनऊ सुपर जायंट्सचा 37 धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाब किंग्जची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली. प्रथम खेळताना संघाने मर्यादित 20 षटकात 236 धावा केल्या गोलंदाजीत लखनऊ संघाला 199 धावांवर रोखले. अशाप्रकारे पंजाबने लखनऊला 37 धावांनी पराभव करत गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

प्रथम फलंदाजी करताना पंजाबने जबरदस्त सुरुवात केली. संघाने 20 षटकांत 236 धावा केल्या. या स्कोअरचा पाठलाग करताना लखनऊचा डाव डगमगला. दोन्ही सलामीवीर अवघ्या 16 धावांत माघारी परतले. एडेन मार्कराम 13 धावा करून बाद झाला, तर मिचेल मार्शला खातेही उघडता आले नाही. संघातील दिग्गज फलंदाज अपयशी ठरले. निकोलस पूरन फक्त 6 धावाच करू शकला. कर्णधार रिषभ पंतचा खराब फॉर्म कायम राहिला; तो 17 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. लखनऊचा अर्धा संघ अवघ्या 73 धावांवर माघारी परतला. एलएसजीचा टाॅप ऑर्डर लवकर बाद झाल्याने संघ सामन्यात खूप मागे पडला.

यानंतर आयुष बदोनी आणि अब्दुल समद यांनी संयमी खेळ करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी मिळून 81 धावांची भागीदारी केली. समदने 24 चेंडूत 45 धावा केल्या, तर आयुष बदोनीने 74 धावा केल्या, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत.

Comments are closed.