चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग रशियाच्या दौऱ्यावर

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग 7 ते 10 मेदरम्यान रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 9 मे रोजी ते रशियाच्या विजय दिन कार्यक्रमाला उपस्थित असतील. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या निमंत्रणावरून शी जिनपिंग विजय दिन सोहळ्यात भाग घेतील. या भेटीत दोन्ही देशांचे प्रमुख अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षरी करतील. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून शी जिनपिंग तिसऱ्यांदा रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

Comments are closed.