दिल्ली-शिर्डी विमानात मद्यधुंद प्रवशाकडून एअरहोस्टेसचा विनयभंग, पोलिसांकडून अटक

विमान प्रवासात एका प्रवाशाने मद्यधुंद अवस्थेत एका एअरहोस्टेसचा विनयभंग केला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार इंडिगोचे एक विमान दिल्लीहून शिर्डीसाठी निघाले होते. तेव्हा एक प्रवासी मद्यधुंद अवस्थेत होता. तेव्हा या प्रवाशाने एका एअरहोस्टेसला चुकीच्या हेतूने स्पर्श केला. तेव्हा एअरहोस्टेसने आरडा ओरड केली आणि आपल्या सहकाऱ्यांना बोलावलं. शिर्डीत विमान लॅण्ड झाल्यानंतर आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

Comments are closed.