मुंबईतल्या पेडर रोडवरील कपड्यांच्या दुकानाला आग, सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबईतल्या पेडर रोडवरील एका पाच मजली कपड्यांच्या दुकानाला आग लागली आहे. अग्निशमन विभागाने वेळीच घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आणली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार पेडर रोडवरील लिबास या कपड्यांच्या दुकानाला आग लागली. ही पाच मजली इमारत असून सकाळी 8.10 मिनिटांनी आग लागल्याचे अग्निशमन दलाला माहिती मिळाली. तेव्हा अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आग नियंत्रणात आली. यावेळी चौथ्या मजल्यावरून चार महिला आणि चार पुरुषांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. तसेच यावेळी तीन कुत्रे आणि दोन मांजरींनाही वाचवण्यात आलं.
महाराष्ट्र: मुंबईच्या पेडदार रोड परिसरातील लिबबास शोरूममध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली. झगमगाट नियंत्रित करण्यासाठी बारा फायर ब्रिगेड वाहने तैनात केली गेली. आतापर्यंत कोणतीही जखम झाली नाही आणि अग्निशमन प्रयत्न चालू आहेत pic.twitter.com/nty5iyv8mj
– आयएएनएस (@ians_india) 5 मे, 2025
Comments are closed.