जनतारुपी नृसिंह राक्षसरूपी भाजपाच्या खलत्वाचा अंत करील; सद्भावना यात्रेत सपकाळ यांचा हल्लाबोल

‘भक्त प्रल्हादाच्या भक्तीमुळे नृसिंह अवतरला, तसाच ईव्हीएम आणि बॅलेट पेपरमधून जनतेच्या मताधिकारातून नवा नृसिंह अवतार घेईल. हा जनतारुपी नृसिंह राक्षसरूपी भाजपाच्या खलत्वाचा अंत करील असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. परभणी येथे सद्भावना यात्रेदरम्यान ते बोलत होते. सामाजिक सलोखा व सद्भाव वाढीस जावा यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली परभणीत आज पोखर्णी येथे नृसिंहाचे दर्शन घेऊन सद्भावना पदयात्रेची सुरुवात झाली.

Comments are closed.