मुंबईकर बिबट्यांची संख्या 54 वर, सहा वर्षात बिबट्यांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ

मुंबईत एकूण 54 बिबट्यांचा सहवास आहे अशी माहिती राज्याच्या वनविभागाने दिली आहे. तसेच गेल्या सहा वर्षांत बिबट्यांच्या संख्येत 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी आणि तुंगारेश्वरसह भागात 54 बिबट्यांचा अधिवास आहे. वनविभागाने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. वनविभागाने फेब्रुवारी ते जून 2024 या काळाता 90 ठिकाणी कॅमेरे लावले होते. या कॅमेऱ्यात हे 54 बिबटे कैद झाले आहेत. वन्यप्राणी संवर्धन संस्था आणि महाराष्ट्र वनविभागाने केलेल्या संयुक्त सर्वेक्षणात एकूण 36 मादा तर 16 नर बिबटे आढळले आहेत. तर दोन बिबट्यांची ओळख पटलेली नाही. यात चार बछड्यांचाही समावेश आहे.

Comments are closed.