Thackeray’s comment on Ajit Pawar’s CM post


‘कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते आहे, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,’ अशी कबुली अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा दिली. अजित पवार हे असे बोलले तरी फडणवीस यांना त्यांच्यापासून धोका नाही.

(Thackeray on Ajit Pawar) मुंबई : महाराष्ट्र सरकारकडे बहुमताचा आकडा आहे, पण सरकार स्थिर आहे काय? याबाबत शंका आहे. सरकार स्थिर नाही आणि सरकारचे मानसिक स्वास्थ्यही बरे नाही असे एकंदरीत रोजच्या घडामोडींवरून दिसते. राज्यातील सत्तापक्षांमध्ये एक प्रकारचे ‘प्रॉक्सी वॉर’ चालले आहे. प्रत्येक जण एकमेकाला आजमावीत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थखात्यात शिस्तीचा बांबू उगारला आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेकेदाराच्या वर्चस्वाला चाप लावल्याने ताजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांच्या घशाला कोरड पडली. संजय शिरसाट या मंत्र्याने अजित पवार यांना ‘शकुनी’ म्हटले. सामाजिक न्याय खात्याचा निधी ‘लाडक्या बहिणीं’साठी वळवला. त्यामुळे सामाजिक न्याय खात्यात फक्त एक मंत्र्याचा बंगला, गाडी आणि दोन चपराशी उरले, अशी कोपरखळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावली आहे. तसेच, अजित पवार यांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, असे सांगत, त्याचे कारणही त्यांनी दिले. (Thackeray’s comment on Ajit Pawar’s CM post)

सामाजिक न्याय खाते बंद करण्याची मागणीच संबंधित मंत्र्याने करावी आणि अजित पवार यांना ‘शकुनी’ म्हणावे इथपर्यंत राज्याच्या सरकारमधील युद्ध पोहोचले आहे. आता शकुनीमामाने आयोजित केलेल्या गौरव सोहळ्यास जाण्याचे ताज्या ताज्या माजी मुख्यमंत्र्यांनी टाळले. प्रश्न इतकाच आहे की, अजित पवार यांना आज जे ‘शकुनी’ म्हणतात, ते उद्या फडणवीस यांना दुर्योधन म्हणायला मागेपुढे पाहणार नाहीत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून केली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : त्यांना थोडी जरी लाज असती तर…, बावनकुळेंच्या विधानावर राऊतांची सडकून टीका

देवेंद्र फडणवीस हे सध्या मुख्यमंत्री आहेत. त्याच वेळी अजित पवार यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे आणि तसे त्यांनी उघडपणे बोलून दाखवले. अजित पवार सहावेळा उपमुख्यमंत्री झाले हा विक्रम आहे, पण इतका तगडा गडी अद्याप मुख्यमंत्री झालेला नाही तसेच भाजपासोबत राहिले तर त्यांच्या मनातली मुख्यमंत्रीपदाची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सवतीच्या पुतण्याला मुख्यमंत्री का करतील? हा साधा प्रश्न आहे, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

‘कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटते आहे, पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही,’ अशी कबुली अजित पवार यांनी शनिवारी पुन्हा दिली. अजित पवार हे असे बोलले तरी फडणवीस यांना त्यांच्यापासून धोका नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपासोबत राहून ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही, राऊतांचा अजित पवारांना टोला



Source link

Comments are closed.