शुबमन गिलला आयपीएलनंतर मिळू शकते टीम इंडियामध्ये मोठी भूमिका
आयपीएल 2025 मध्ये शुबमन गिलचा संघ शानदार फॉर्ममध्ये दिसत आहे. याशिवाय कर्णधार शुबमन गिल सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. तसेच आयपीएल 2025 नंतर सुद्धा शुबमन गिलला इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आयपीएल नंतर टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया आयपीएल नंतर इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाला 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. याआधी रिपोर्ट समोर आला आहे की, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या मालिकेतून बाहेर राहू शकतो. टीम इंडियाच्या सूत्रांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, आम्हाला असा खेळाडू हवा आहे जो सर्व 5 कसोटी सामन्यांमध्ये उपलब्ध असेल आणि त्याला उपकर्णधार पदाची भूमिका दिली जाईल. बुमराह सर्व पाच सामने खेळणार नाही. यासाठी आम्ही वेगवेगळ्या सामन्यांसाठी वेगवेगळे उपकर्णधार निवडू शकत नाही. त्यामुळे योग्य हेच असेल की, कर्णधार आणि उपकर्णधार सुनिश्चित आधीच केले जावे आणि सर्व पाच कसोटी सामने त्यांनी खेळावे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी दरम्यान जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती, ज्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा तो खेळू शकला नाही. तसेच आयपीएलचे सुरुवातीचे सामने देखील त्याला खेळता आले नाहीत.
तसेच आता इंग्लंड दौऱ्यासाठी उपकर्णधार पदासाठी शुबमन गिल योग्य मानला जात आहे. आयपीएलमध्ये सुद्धा त्याने शानदार पद्धतीने कर्णधार पद भूषवले आहे. गिलच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत अठराव्या हंगामात गुजरात टायटन्सने 10 सामने खेळले आहे, ज्यामध्ये त्यांना 7 विजय आणि 3 पराभव त्यांनी पत्करले आहेत.
Comments are closed.