Thackeray taunt to Shinde over the CM post


विधानसभा निवडणुकीनंतरही आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या ‘पक्षप्रमुखां’नी म्हणजे अमित शहा यांनी सांगितले होते, पण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढलेले ताट हिसकावून घेतले.

(Thackeray on Shinde) मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मुख्यमंत्र्यांचा गौरव सोहळा आयोजित केला होता. महाराष्ट्रात या पक्षाचे काम अजित पवार बघतात. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराची टूम त्यांनी काढली. मात्र, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री म्हणून सत्कार सोहळ्यास येणे टाळले. कारण ‘आपण आता मुख्यमंत्री नाही’ हे स्वीकारायला त्यांचे मन तयार नाही, अशी बोचरी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray taunt to Shinde over the CM post)

विधानसभा निवडणुकीनंतरही आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांना त्यांच्या ‘पक्षप्रमुखां’नी म्हणजे अमित शहा यांनी सांगितले होते, पण विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाढलेले ताट हिसकावून घेतले. तेव्हापासून हे महाशय दाढीला गाठ बांधून फिरत आहेत. ‘‘पुन्हा मुख्यमंत्री होऊनच दाखवतो,’’ अशाच तोऱ्यात ते फिरत असतात. खरे म्हणजे शिंदे हे स्वतःला ‘माजी’ म्हणवून घ्यायला तयार नसतील तर त्यांनी स्वतःला सदैव ‘भावी मुख्यमंत्री’ असे म्हणवून घ्यायला हरकत नाही, अशी कोपरखळीही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : भाजपासोबत राहून ते कधीच मुख्यमंत्री होणार नाही, राऊतांचा अजित पवारांना टोला

वरळीच्या जांबोरी मैदानात झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यात तसे कोणी फिरकलेच नाहीत. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे हे माजी मुख्यमंत्री या ‘गौरव सोहळ्या’त फिरकले नाहीत हे समजण्यासारखे आहे, पण जिते-जागते-ताजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही गौरव सोहळ्यावर बहिष्कार टाकला आणि आपला प्रतिनिधी त्या कार्यक्रमास पाठवला, असे ठाकरे यांनी सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.

अजित पवार यांच्या गटाने आयोजित केलेल्या सत्कार सोहळ्यास दोन माजी मुख्यमंत्री हजर राहिले. त्यापैकी एक नारायण राणे हे शिवसेना-भाजपा युती सरकारमध्ये मुख्यमंत्री होते. नंतर त्यांनी बरेच पक्ष बदलले, पण मुख्यमंत्री काही झाले नाहीत. याचा अर्थ शिवसेनाप्रमुखांनी अनेक दगडांना शेंदूर फासला आणि देव बनवले. ‘‘शिवसेना नसती तर पोलिसांनी आपले एन्काऊंटरच केले असते. शिवसेना होती म्हणून वाचलो,’’ अशी कबुलीच राणे यांनी पूर्वी दिली आहे, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

दुसरे उपस्थित राहिलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्रीपद संरक्षण खात्याच्या आदर्श घोटाळ्यात गेले. आता ते भाजपामध्ये गेले आहेत. अशा मुख्यमंत्र्यांचा (माजी) सत्कार अजित पवार गटाने केला. फडणवीस यांचा सत्कार ‘माजी’ की ‘आजी’ म्हणून केला ते समजले नाही, पण ‘ताजे’ माजी मुख्यमंत्री आले नाहीत आणि अजित पवार यांचा सोहळा फिका पडला, असा टोलाही ठाकरे यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Thackeray on Ajit Pawar : राज्यातील सत्तापक्षांमध्ये ‘प्रॉक्सी वॉर’ सुरू आहे, उद्धव ठाकरेंची टीका



Source link

Comments are closed.