राज्यात पाच दिवस अवकाळीचा अंदाज; गारपिटीची शक्यता
पुढील पाच दिवस महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱयासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात आज दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण होते. मात्र आर्द्रतेमुळे मुंबईकरांची घामाने अंघोळ झाली.
गुजरातलगतच्या अरबी समुद्रात वाऱयांची चक्रीय परिस्थिती निर्माण झाल्यामुळे विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह काही भागात वादळी वाऱयासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, सातारा, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, जळगाव, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ, बीड, अमरावती आणि भंडारा या जिह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गडचिरोली आणि चंद्रपूर या जिह्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट असून बुलढाणा, अकोला आणि वाशीम वगळता उर्वरित जिह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Comments are closed.