SRH vs DC IPL 2025: सर सुखाची श्रावणी
एसआरएच वि डीसी आयपीएल 2025: हैदराबादमध्ये आलेल्या पावसाच्या सरी दिल्ली संघासाठी सुखाचा श्रावण घेऊन आला. काल दिल्ली संघाने आणि त्यांचा कर्णधार अक्षर याने “सर सुखाची श्रावणी की नाचरा वळीव हा ” हेच गाणे गायले असेल..स्पर्धा अंतिम टप्प्यात आहे..झोकात सुरुवात करणाऱ्या दिल्ली संघाची अचानक पिछेहाट झाली….दहा सामन्यानंतर बारा गुणावर राहिल्या नंतर प्रत्येक विजय महत्वाचा होता..आज नाणेफेक हरल्यावर प्रथम फलंदाजी करीत असताना दिल्ली संघाची अवस्था केविलवाणी झाली…याला कारण होते कर्णधार पॅट कमिन्स….दिल्ली संघाची आघाडीची फळी त्यांनी कापून काढली..त्याने आज गोलंदाजी करीत असताना तो कदाचित हे विसरूनच गेला असेल की त्याच्या हातात पांढरा चेंडू आहे….त्याने तो जी कसोटीत गोलंदाजी करतो तशी गोलंदाजी केली…आणि कसोटीत पॅट आज ही जगातील कुठं ही एक सर्वोत्तम गोलंदाज आहे… करुण नायर याला जो पाहिलाच चेंडू टाकला…तो कसोटीतील शुद्ध चेंडू होता…उजव्या यष्टि बाहेर जाणारा चेंडू… करुण च्या बॅट् चे चुंबन घेऊन गेला…पण त्या चुंबनात सहवासाचा आनंद भेटण्या पेक्षा विरहाचा आनंद देऊन गेला…तिसऱ्याच षटकात अभिषेक पोरेल फ्लिक करताना सापडला …त्यानंतर पाचव्या षटकात पुन्हा एकदा डुप्लिसी याची हजेरी लावून त्याला आराम करण्यासाठी पाठविले. पेट कमिन्स एवढं करून थांबला नाही…त्याने कर्णधार अक्षर याचा सुंदर झेल घेऊन आजचा दिवस त्याचा आहे हे दाखवून दिले.
हर्षल पटेल याचा एक थांबून आलेल्या चेंडू अक्षर थोडा आधी खेळून बसला..आणि आज पॅट कमिन्स याने कोणतीही चूक केली नाही…( गुजरात विरुद्ध बटलर याचा सोपा झेल मिड ऑफ वर सोडला होता)….आपला कर्णधाराने आज जो आदर्श घालून दिला ..तोच आदर्श उनाडकट याने ठेवला .. राऊंड दि विकेट येऊन त्याने राहुलचा अडथळा दूर केला….पाच बाद २९ अशी अवस्था असताना विपराज आणि स्टब चांगले खेळत असताना …पुन्हा एकदा दिल्ली संघाचे दुर्दैव आडवे आले…. स्टब आणि विपराज आपापसातील सामन्यव हरवून बसले आणि विपराज धावचीत झाला…. इम्पॅक्ट सब आलेला आशुतोष ४१ धावा काढून गेला..पण दिल्ली संघ फक्त १३७ धावा करू शकला.. आज जो पाऊस पडला तो दिल्ली संघासाठी सुखाचा श्रावण घेऊन आला….दिल्ली संघाला एक गुणांची कमाई झाली..त्यांचे आता १३ गुण झाले…अजून त्यांचे ३ सामने शिल्लक आहेत…उरलेले तिन्ही सामने जर दिल्ली संघाने जिंकले तर त्यांचे १९ गुण होतील…आणि ज्या संघाचे १८ गुण आहेत त्यांच्या ते पुढे असतील…जर दिल्ली संघ दोन विजय घेऊन थांबला तरी त्यांचे १७ गुण असतील आणि ज्या संघाचे १६ गुण आहेत त्यांच्या पेक्षा एक गुण अधिक असेल… आज दिल्ली संघ मनातला मनात आनंदी असेल..कारण हैदराबाद संघाची फलंदाजी तगडी होती…त्यामुळे अक्षर आणि त्याचे सहकार मनातल्या मनात पाऊस आला धावून ..एक गुण ,गेला देऊन हे गाणे गुणगुणतील… कारण ..एक पॉईंट की किंमत तुम क्या जानो रमेश बाबू…पंजाब आणि कोलकाता हे संघ पण असेच म्हणतील .. हे सुद्धा तितकेच खरे..
हा लेखही वाचा:
एमआय वि आरआर आयपीएल 2025: महाराष्ट्रडिनी राजधानी मुंबई अववाल
अधिक पाहा..
Comments are closed.