यूएईमध्ये नर्सरीच्या मुलांना मिळणार एआयचे धडे

संयुक्त अरब अमिरात (यूएई) मध्ये आता विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) शिकवले जाणार आहे. 2026 पासून देशातील सर्व सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना एआय शिकवले जाणार असून नर्सरीच्या मुलांना एआयसारख्या हाय टेक्नोलॉजीचे धडे दिले जाणार आहेत. एआय शिकवण्याचा निर्णय दुबईचे शासनकर्ते आणि उपराष्ट्रपती शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी घेतला आहे. एआयचा कोर्स वयानुसार तयार करण्यात आला आहे.
Comments are closed.