MI vs GT: आज मुंबईने गुजरातला लोळवले, तर कर्णधार हार्दिक पांड्या रचणार इतिहास! करणार 'हा' पराक्रम
यंदाच्या आयपीएल हंगामातील 56वा सामना आज (6 मे) वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यासाठी चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आमने-सामने असणार आहेत. (MI vs GT) हंगामाच्या सुरूवातील मुंबईची सुरूवात खूपच खराब झाली होती. संघाने पहिल्या 5 पैकी फक्त 1 सामना जिंकला होता. पण त्यानंतर संघाने दमदार पुनरागमन केलं. 5 वेळच्या चॅम्पियन संघाचे सलग 6 विजयांसह 14 गुण आहेत आणि ते गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहेत.
आयपीएलमध्ये मुंबईने सलग 6 सामने जिंकण्याची ही तिसरी वेळ आहे. 2008च्या सुरुवातीच्या हंगामानंतर आणि 2017च्या विजयी हंगामानंतर, आता 2025 मध्ये, मुंबई पलटनने विजयांचा एक षटकार मारला आहे.
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आज (6 मे) त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सशी भिडणार आहे. जर उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने हा सामनाही जिंकला, तर आयपीएलमध्ये सलग 7 सामने जिंकण्याची ही पहिलीच वेळ असेल. दरम्यान या विक्रमी विजयाचे श्रेय कर्णधार हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) जाईल.
मुंबई इंडियन्सकडे ट्रेंट बोल्ट (16 विकेट्स), हार्दिक पांड्या (13), जसप्रीत बुमराह (11) आणि दीपक चहर (9) सारखे धोकादायक वेगवान गोलंदाज आहेत, ज्यांच्यासमोर गुजरातचा साई सुदर्शन (504 धावा), जोस बटलर (470) आणि कर्णधार शुबमन गिल (465) हे देखील उत्तम फॉर्ममध्ये आहेत. अशा परिस्थितीत, सामना रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
मुंबई विजयी मार्गावर परतल्यापासून, त्यांनी कोणत्याही सामन्यात प्रतिस्पर्धी संघाला 200 पेक्षा जास्त धावा करू दिलेल्या नाहीत. खराब सुरुवातीनंतर सलग 6 सामने जिंकल्यानंतर मुंबई आत्मविश्वासाने भरलेली आहे. तर गुजरातच्या यशाचे मागे त्यांच्या फलंदाजांची कामगिरी आहे.
Comments are closed.