मुंबईच्या विजयाने ‘या' संघाच्या अडचणी वाढणार? बिघडू शकतं प्लेऑफचं गणित
आयपीएल 2025 स्पर्धेतील 56 वा सामना आज म्हणजेच 6 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघांमध्ये खेळला जाणार आहे. मुंबईने जर हा सामना जिंकला तर, त्यांचा प्लेऑफ मध्ये पोहोचण्याचा मार्ग पक्का होईल संघ सध्या 11 सामन्यांमध्ये सात विजय मिळवून त्यांचे 14 गुण आहेत आणि ते पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर आहेत. जर त्यांनी आज विजय मिळवला तर ते पॉईंट्स टेबलवर पहिल्या स्थानावर पोहोचतील कारण त्यांचा नीट रन रेट आरसीबीपेक्षा अधिक जास्त आहे.
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या विजयानंतर सर्वात जास्त तोटा रिषभ पंतंच्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा होणार आहे. जे सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहेत.
मुंबईने जर आजच्या सामन्यात विजय मिळवला तर इतिहासात पहिल्यांदा ते सलग सात सामने जिंकतील. संघाने याआधी 2008 आणि 2017 मध्ये हा विक्रम केला आहे. जेव्हा त्यांनी सलग सहा सामने जिंकले आहेत. पण आजपर्यंत मुंबईने सलग सात सामने जिंकले नाहीत.
Comments are closed.