Jayant Patil targets maharashtra state government after Supreme Court orders to hold maharashtra local body elections


निक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची अधिसूचना येत्या चार आठवड्यात काढावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचपार्श्वभूमीवर आता विरोधक सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चातकासारखी वाट पाहणाऱ्या राजकीय पक्ष, नेते मंडळी आणि इच्छुकांना आज (06 मे) नक्कीच आनंद झाला असेल. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची अधिसूचना येत्या चार आठवड्यात काढावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. याचपार्श्वभूमीवर आता विरोधक सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Jayant Patil targets maharashtra state government after Supreme Court orders to hold maharashtra local body elections)

जयंत पाटील यांनी ट्वीट करताना म्हटले की, लोकशाही वाचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. कारण गेली 3 वर्षे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुका संपन्न झाल्या नव्हत्या. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेली 3 वर्षे प्रशासकीय अधिकारी चालवत आहेत, ही बाब लक्षात आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांची घोषणा एक महिन्याच्या आत करण्याचा आणि निवडणुका प्रक्रिया चार महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचा अंतरिम आदेश दिला आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Breaking News : सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च आदेश, पुढील चार महिन्यांत होणार पालिका निवडणुका

जयंत पाटील म्हणाले की, ओबीसी आरक्षणाबाबतच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशाच्या अधीन राहून या निवडणुका होतील. परंतु सध्या राज्यातील सर्वच राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गरजेच्या आहेत. 3 वर्षांच्या विलंबाने का होईना, नवीन नेतृत्व तयार होण्यासाठी आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या निवडणुका घेण्याचा आदेश दिल्याबद्दल मी आमच्या पक्षाच्या वतीने देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो, असे पाटील यांनी म्हटले.

जयंत पाटील यांचा राज्यसरकारवर निशाणा

जयंत पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आदेश देताना निवडणूक आयोगास आवश्यकता भासल्यास निवडणूक घेण्याबाबत मुदतवाढ घेण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे आता राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आडून निवडणुका घेण्यास चालढकल करू नये, अशीच आमची अपेक्षा आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Election 2025 : पुढील 4 महिन्यांत या पालिका अन् जिल्हा परिषदेची रणधुमाळी





Source link

Comments are closed.