Mockdrill साठी सिव्हिल डिफेन्सचे दहा हजार स्वयंसेवक महाराष्ट्रात दाखल
केंद्रीय गृह मंत्रालयाने 7 मे रोजी सर्व राज्यांना ब्लॅकआऊट आणि मॉकड्रीलचे निर्देश दिले आहेत. यासाठी सिव्हिल डिफेन्सचे तब्बल दहा हजार स्वयंसेवक मुंबईत दाखल होणार आहेत. बुधवारी दुपारी चार नंतर मॉकड्रीलला सुरुवात होणार आहे. या स्वयंसेवकांना वेगवेगळ्या सिच्युएशन दिल्या जाणार आहेत.
पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, डॉक्टर, पॅरामेडिक्स, होमगार्ड व कलेक्टरच्या हाताखाली काम करणारे कर्मचारी देखील या मॉकड्रीलमध्ये सहभागी होतील, असे सिव्हिल डिफेन्सचे डायरेक्टर प्रभात कुमार यांनी सांगितले.
कश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर, दहशतवाद्यांविरोधात आता हिंदुस्थान कारवाई करण्याची दाट शक्यता आहे. यावर केंद्रीय गृहखात्याने देशातील सर्व राज्यांना उद्या (7 मे) मॉक ड्रील घेण्याचे आदेश देऊ केले आहेत. सध्याच्या घडीला केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार देखील आता हायअलर्ट मोडवर आहे.
महाराष्ट्रातील या 16 ठिकाणी होणार युद्धाची मॉकड्रील-
मुंबई, उरण-जेएनपीटी, तारापूर, पुणे, ठाणे, नाशिक, थळ-वायशेत, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, पिंपरी-चिंचवड, संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंंधुदुर्ग
Comments are closed.