देशी 'आकाश' ने सर्वोत्कृष्ट दर्शविले
देशातच निर्मित आकाश या जमिनीवरून आकाशात मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र हवाई सुरक्षा प्रणालीने पाकिस्तानी ड्रोन हल्ले हाणून पाडण्यास महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 8-9 मेदरम्यान भारतीय सैन्याने पश्चिम सीमा आणि जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून करण्यात आलेले अनेक ड्रोन हल्ले अपयशी ठरवत प्रत्युत्तर दिले आहे.
भारतीय सैन्य आणि वायुदलाने पाकिस्तान सीमेवर क्षेपणास्त्र प्रणाली तैनात केली आहे. भारतात निर्मित आकाश या क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीचा पाकिस्तानी हल्ले हाणून पाडण्यासाठी प्रभावीपणे वापर करण्यात आला असल्याची माहिती संरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हवाई धोक्यांपासून वाचविणारे स्वदेशी अस्त्र
आकाश या यंत्रणेची निर्मिती डीआरडीओने केली आहे. डीआरडीओकडून विकसित आकाश एक मध्यम पल्ल्याचे जमिनीवरून आकाशात मारा करणारी क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणाली आहे. आकाश बॅटरी क्षेपणास्त्र प्रणाली 18,000 मीटरच्या उंचीवर 45 किलोमीटर अंतरापर्यंतच्या विमानांना लक्ष्य करू शकते. यात लढाऊ विमाने, क्रूज क्षेपणास्त्रs आणि आकाशातून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांसह बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांना नष्ट करण्याची क्षमता आहे.
कुठेही तैनात करण्याची सुविधा
आकाश यंत्रणा ही कुठेही नेता येते, याला नियंत्रण रेषा किंच्वा अन्य सीमेवर ट्रक किंवा अन्य वाहनांद्वारे नेले जाऊ शकते. याचे अॅडव्हान्स वर्जन आकाश-एनजी 70 ते 80 किलोमीटरपर्यंत मारा करू शकते. याचा वेग जवळपास 2500 किलोमीटर प्रतितास आहे. हे 150 किलोमीटर अंतरापर्यंतच्या 64 लक्ष्यांना ट्रॅक करू शकते. तसेच ही यंत्रणा एकाचवेळी 12 क्षेपणास्त्रांना डागू शकते. यातील क्षेपणास्त्रांमध्ये स्मार्ट गायडेन्स सिस्टीम असून ती अखेरच्या क्षणात देखील लक्ष्याला लॉक करण्यास मदत करते
64 लक्ष्यांना ट्रॅक, 12 वर करू शकते हल्ला
आकाश यंत्रणेत एक राजेंद्र 3डी पॅसिव्ह इलेक्ट्रॉनिकली स्कॅन्ड ऐरे रडार आणि 4 लाँचर असतात. यातील प्रत्येकात तीन क्षेपणास्त्रs असतात. ही सर्व परस्परांमध्ये जोडलेली असतात. प्रत्येक बॅटरी 64 लक्ष्यांना ट्रॅक करू शकते आणि यातील 12 लक्ष्यांवर हल्ला करू शकते.
Comments are closed.