उल्हासनगरच्या जवानाचा दिल्लीत हृदयविकाराने मृत्यू

सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्समध्ये कार्यरत असणाऱ्या उल्हासनगरातील जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने दिल्लीत मृत्यू झाला. अनिल अशोक निकम असे या जवानाचे नाव असून तिरंग्यात लपेटून त्यांचे पार्थिव शहरात आणण्यात आले. फोर्सने सलामी दिल्यावर अनिल यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले.
अनिल निकम हे चोपडा कोर्ट परिसरातील साईबाबा मंदिराजवळ राहत होते. त्यांचे वडील अशोक निकम हे आर्मीमध्ये कर्नल होते. त्यांचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. अनिल निकम यांनी सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स जॉईन केल्यावर ते पत्नी ज्योती निकम, मुलगा जतीन आणि अडीच वर्षीय मुलगी गार्गी यांच्यासोबत दिल्ली हेडक्वार्टरमध्ये राहत होते. पाकिस्तानसोबत युद्ध सुरू झाल्याने सर्व सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. दिल्लीतील हेड क्वार्टरमध्ये कार्यरत असताना अनिल निकम त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांचे पार्थिव पहाटे 4 च्या विमानाने तिरंग्यात लपेटून मुंबईत आणल्यावर तेथून रुग्णवाहिकेतून उल्हासनगरात आणण्यात आले.
Comments are closed.