Water Jar : उन्हाळ्यात थंड जारमधील पाणी पिताय?

उन्हाळा सुरू झाला की, उष्णतेपासून दिलासा मिळावा म्हणून थंडगार पाणी प्यायले जाते. उन्हाळ्यात कोणता कार्यक्रम असो, लग्न, साखरपुडा कित्येक ठिकाणी आपल्याला पाहूणे मंडळीसाठी ठेवलेला थंडगार पाण्याचा जार दिसतो. बाजारात मिळणारे हे जार 15 ते 20 लिटरचे असतात. हल्ली कित्येकजण याचा बिझनेस करतात. मात्र, थंडगार जारमधील पाणी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. काही ठिकाणी हे पाणी फ्रीजिंग टेक्नोलॉजीने थंड केलेले नसते तर चक्क एका केमिकलचा वापरू करून थंड केले जाते. आपण तहान भागवण्यासाठी घटा-घटा जारमधील पाणी पिऊन मोकळे होतो, खरे… पण, त्याचे होणारे दुष्परिणाम लक्षात घेत नाही. त्यामुळे आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात, उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो.

आयुर्वेदानुसार, उन्हाळ्यात थंड पाणी प्यायल्याने शरीरावर नकारात्मक परिणाम होऊन शरीराच्या विविध व्याधी सुरू होतात. त्यातच या जारमधील पाणी थंड करण्यासाठी एथिलिन ग्लाइकॉल नावाचे केमिकल असते. बाजारात उपलब्ध असणाऱ्या या केमिकलमुळे पाण्याचा फ्रीजिंग पॉंइट हा कमी होतो. त्यामुळे पाणी लगेचच थंड होते. जोपर्यंत हे केमिकल त्या पाण्यात आहे तोपर्यंत पाणी थंडगार राहते, त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी हे पाण्याचे जार वापरले जातात. त्यातच थंड पाण्यासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक जार हे निकृष्ट दर्जाचे प्लास्टिकपासून तयार केले जाते. त्यामुळे तज्ज्ञ मंडळी उन्हाळ्यात थंड पाणी टाळून माठातील पाणी पिण्याचा सल्ला देतात. माठातील पाणी पूर्णत: नैसर्गिकरित्या थंड होते.

माठातील पाणी पिण्याचे फायदे –

  • माठाच्या पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.
  • या पाण्याच्या सेवनाने पोटात गॅस निर्माण होते.
  • माठातील पाणी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर आहे.
  • या पाण्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
  • माठातील पाणी त्वचेसाठी उत्तम असते.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=viqm4pukj5K

Comments are closed.