रोहित शर्माचा कसोटीतील 'हा' रेकॉर्ड मोडणे कोणत्याही फलंदाजासाठी अशक्य?
भारताचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटला अलविदा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये शेवटचा सामना खेळलेल्या रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी संघ जाहीर होण्याच्या काही दिवस आधी निवृत्तीची माहिती दिली. त्याने बुधवारी (7 मे) इंस्टाग्राम स्टोरीद्वारे निवृत्तीबद्दल माहिती दिली. तत्पूर्वी लाल बॉल क्रिकेटमध्ये जरी त्याचा फॉर्म चिंतेचा विषय बनला होता, तरीही त्याच्या नावावर एक आश्चर्यकारक विश्वविक्रम आहे, जो त्याच्या कसोटी शतकांशी जोडलेला आहे.
खरे तर रोहित शर्मा (Rohit Sharma) हा जगातील एकमेव फलंदाज आहे ज्याने आपल्या कारकिर्दीत 10 पेक्षा जास्त शतके झळकावली आहेत आणि सर्व शतके विजयात आली आहेत. रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 12 शतके झळकावली आहेत आणि भारतीय संघाने हे सर्व सामने जिंकले आहेत.
जगामध्ये असे आणखी 2 खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अशी कामगिरी केली. हे दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाचे होते.
ऑस्ट्रेलियाच्या वॉर्विक आर्मस्ट्राँगने आपल्या कसोटी कारकिर्दीत 6 शतके झळकावली आणि संघाने ते सर्व सामने जिंकले. या यादीत तिसऱ्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज आणि प्रशिक्षक डॅरेन लेहमन आहे, ज्यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत 5 शतके झळकावली आणि त्या 5 शतकांमध्ये ऑस्ट्रेलियन संघ विजयी झाला. अशाप्रकारे, रोहित शर्मासाठी असे म्हणता येईल की त्याने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे, कारण आजच्या काळात हा विक्रम मोडणे कोणालाही शक्य दिसत नाही.
आपल्या कसोटी कारकीर्दीत सर्व कसोटी सामन्यात विजयी शतके झळकावणारे फलंदाज-
(किमान 5 शतके)
12/12 – रोहित शर्मा
6/6 – वॉरविक आर्मस्ट्राँग
5/5 – डॅरेन लेहमन
Comments are closed.