पाकिस्तानच्या शेअर बाजारात पुन्हा हाहाकार! अवघ्या एका दिवसात 820 अब्ज रुपयांचे नुकसान

पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाचा परिणाम दोन्ही देशांच्या बाजारपेठांवर दिसून येत आहे. या भू-राजकीय तणावादरम्यान, भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या शेअर बाजारांमध्ये चढ-उतार होत आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने कारवाई केल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात मोठी घसरण झाली. केवळ तीन दिवसांत बाजार मूल्यांकन 1.3 ट्रिलियन रुपयांनी घसरले आहे.

अवघ्या एका दिवसात 820अब्ज रुपयांचे नुकसान

दरम्यान, गुरुवारीही दिवसभराच्या व्यवहारादरम्यान केएसई-100 निर्देशांकात मोठे चढ-उतार दिसून आले. भारतीय सैन्याने केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानचा शेअर बाजार 6 टक्क्यांहून अधिक घसरला. यामुळे तासभर व्यवहार थांबवावे लागले. केएसई-100 निर्देशांकातील आतापर्यंतच्या सर्वात वाईट इंट्राडे अस्थिरतेनंतर, गुंतवणूकदारांमध्ये घबराट इतकी वाढली की केवळ एका ट्रेडिंग सत्रात मार्केट कॅप 820 अब्ज रुपयांनी घसरला. यासह, निर्देशांक देखील 6,400 पेक्षा जास्त अंकांनी घसरला आणि त्याच्या नीचांकी पातळीवर पोहोचला.

तीन दिवसांमध्ये मोठी उलथापालथ, अनेकांना फुटला घाम

गेल्या तीन ट्रेडिंग सत्रांमध्ये पाकिस्तानच्या शेअर बाजाराच्या मार्केट कॅपला 1.3 ट्रिलियन रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारीच्या व्यापार सत्रात केएसई-100 निर्देशांकात 10,000 पेक्षा जास्त अंकांची अस्थिरता दिसून आली, जो दिवसभरात 1872 अंकांच्या उच्चांकावर पोहोचला आणि नंतर 8,410 अंकांचा नीचांक गाठला.

भारतीय शेअर बाजारालाही फटका

या तणावाचा परिणाम भारतीय शेअर बाजारातही दिसून येत आहे. चौफेर विक्रीमुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना दोन दिवसांत 7 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.या वाढत्या अनिश्चिततेमध्ये, बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 7, 09, 783.30 कोटी रुपयांनी घसरून 4,16,40 ,850.46 कोटी रुपये (यूएस $ 4.86 ट्रिलियन) झाले.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया काय म्हणाले?

भारत-पाक संघर्षात अमेरिकेची परस्परविरोधी वक्तव्ये दिसून येत आहे. दोन्ही देशांनी तणाव कमी करावा असं आवाहन अमेरिकेने केलं आहे. मार्को रुबिया यांनी भारत-पाकला चर्चेसाठी मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसेच पाकच्या लष्करप्रमुखांना आज अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी फोन केला. यावेळी ठोस चर्चा करुन संभाव्य धोका टाळण्याचं आवाहन परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया यांनी केलं.

हे देखील वाचा:

अधिक पाहा..

Comments are closed.