3 कारणं, ज्यामुळे विराटच्या कसोटी रिटायरमेंटचा योग्य टाइमिंग साधला जाईल!
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. त्याने याची माहिती बीसीसीआयला आधीच दिली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार या माहितीने चाहत्यांच्या मनावर निराशा पसरली आहे. त्या आधीच रोहित शर्माने कसोटी रिटायरमेंट जाहीर करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्या चर्चा अजून पचवू शकत नाही तोपर्यंत विराट कोहलीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आले आहे.
बीसीसीआयने याबद्दलची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. पण रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, बीसीसीआयचे अधिकारी यांनी किंग कोहलीला या निर्णयावर पुन्हा विचार करण्यात सांगितले आहे. पण असे वाटत नाही की तो त्याचा विचार बदलेल.
टी20 आंतरराष्ट्रीयमध्ये रोहित आणि विराटने सोबत निवृत्ती घेतल्यानंतर आता कसोटी मधून रोहित नंतर विराट सुद्धा निवृत्तीचा विचार करू शकतो. जाणून घ्या तीन मोठी कारणं ज्यामुळे हे समजेल की, सध्या विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची योग्य वेळ आहे का?
36 वर्षांच्या विराट कोहलीने आत्तापर्यंत 123 कसोटी सामने खेळत 9230 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये त्याच्या बॅटने 51 अर्धशतक तसेच 30 शतक झळकले आहेत. युवा खेळाडूंना संधी मिळावी यासाठी देखील विराट कोहली निवृत्तीचा विचार करू शकतो.
विराट कोहलीचं कसोटी क्रिकेटमध्ये काही वेळापासून चांगलं प्रदर्शन झालं नाही. मागच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कोहली एकाच पद्धतीने सारखा बाद होताना दिसत होता.
त्याने फक्त पर्थ टेस्ट मालिकेत 100 धावांची नाबाद पारि खेळली होती. पण त्यानंतर त्याला धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. या मालिकेत टीम इंडियाला 1-3 ने पराभवाचा सामना करावा लागला होता. त्याआधी सुद्धा न्यूझीलंडने भारताचा कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव केला होता. तेव्हाही किंग कोहलीला काही प्रभावी कामगिरी करता आली नाही. तो तीन सामन्यात शंभर धावा देखील करू शकला नाही.
2011 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या किंग कोहलीने 2019 पर्यंत शानदार प्रदर्शन केलं आहे. त्याची फलंदाजी सरासरी 54 राहिली आहे. ज्यामध्ये त्याने 27 शतक झळकावली आहेत, पण 2020 नंतर त्याचे प्रदर्शन म्हणावं तितकं चांगलं झालं नाही.
विराट सध्या 36 वर्षांचा आहे आणि त्याला 2027 चा वनडे विश्वकप खेळायचा आहे, त्यामुळे त्याला त्याच्या फिटनेसवर लक्ष द्यावे लागेल.
Comments are closed.