'या' दिवशी मिळणार टीम इंडियाला नवा कसोटी कर्णधार!
भारताचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घेतल्यानंतर आता कसोटी क्रिकेटचा नवीन कर्णधार कोण असेल? या चर्चांना उधाण आले आहे. त्याच्या पाठोपाठच विराट कोहली सुद्धा कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे आणि ती माहिती त्याने आधीच बीसीसीआयला दिलेली आहे, परंतु बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून त्याला या निर्णयावर पुनर्विचार करण्यासाठी सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता कसोटी क्रिकेट मधील नवा कर्णधार कोण असेल चला तर जाणून घेऊया.
23 मे रोजी टीम इंडियाला नवा कसोटी कर्णधार मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. नवीन कर्णधाराच्या घोषणेसाठी बीसीसीआय 23 मे रोजी पत्रकार परिषद घेणार आहे, तसेच इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवड आणि कर्णधार पदाची घोषणा त्यावेळी करण्यात येणार आहे. जून मध्ये टीम इंडियाला इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. त्याआधी पुढचा नवा कसोटी करण्यात कोण होईल हे समजेल.
रोहित शर्मा नंतर कर्णधार पद कोण सांभाळणार? हे 23 मे रोजी समजेल, परंतु सध्या जसप्रीत बुमराह, शुबमन गिल, के एल राहुल हे पर्याय कर्णधार पदासाठी विचारात घेतले जात आहेत. जसप्रीत बुमराह कर्णधार असावा असे बरेच दिग्गजांचे मत आहे. तसेच के एल राहुलने देखील या आधी भारताचे नेतृत्व केले आहे. याचबरोबर गिल सुद्धा ही जबाबदारी सांभाळण्यासाठी योग्य आहे, असे काही जणांचे म्हणणे आहे. त्यामुळेच आता हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे की, टीम इंडियाचा नवा कसोटी कर्णधार कोण असणार आहे?
Comments are closed.