Mothers Day 2025: मदर्स डे ची सुरूवात कशी झाली?
मराठीतील प्रसिद्ध कवी यशवंत यांच्या ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी…’ या ओळी आईला नमन करणाऱ्या आहेत. या ओळींप्रमाणे खरंच, आईविना कोणीच नाही आणि आईसारखे कोणीही नाही. आई ही आपली पहिली गुरू असते. आई या शब्दांतच प्रेम, ममता, त्याग आणि बलिदान दडले आहे. या जगात कोणी सुट्टी न घेणारी व्यक्ती शोधायची झाल्यास त्याचे उत्तर आई, हे नक्कीच असेल. याच मातृत्वाला सन्मान देण्यासाठी, तिला वंदन करण्यासाठी दरवर्षी जगभरात मदर्स डे मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो. यंदा 11 मे रोजी मदर्स डे साजरा होणार आहे. आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत मदर्स डे चं महत्त्व आणि या दिनाची सुरूवात कशी झाली? या सर्वाची माहिती,
अशी झाली सुरूवात –
1908 मध्ये मदर्स डे ची सुरूवात अमेरिकेत झाली. एना जार्विस Anna Jarvis नावाच्या महिलेने ही सुरूवात केली. जार्विस यांचे त्यांच्या आईवर खूप प्रेम होते. त्यांच्या आई एक समाजसेविका होत्या. त्यांच्या आईच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळावी म्हणून मातांसाठी एक विशेष दिवस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. एना जार्विसने 1908 मध्ये तीने मदर्स डे इंटरनॅशनल असोसिएशनची स्थापना केली. या असोसिएशनचा मुख्य उद्देश होता, तो मातांना आदर देण्यासाठी एक राष्ट्रीय दिवस साजरा करणे. एनाच्या प्रयत्नांमुळे 1914 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष वुडरो विल्सन यांनी मदर्स डे ला एक राष्ट्रीय सुट्टी म्हणून मान्यता दिली.
रविवारीच का ?
एना यांनी या दिवसाची पायाभरणी केली असली, तरी मदर्स डे ची औपचारिक सुरुवात 9 मे 1914 रोजी झाली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी मदर्स साजरा करण्यास मान्यता दिली. अमेरिकेने संसदेत कायदा केला आणि मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिन साजरा करण्याची घोषणा केली.
हेही पाहा –
Comments are closed.