प्रतीक्षा संपली… दहावीचा आज निकाल! दुपारी 1 वाजता वेबसाइटवर जाहीर होणार
विद्यार्थ्यांच्या भवितव्याची दिशा ठरवणारा दहावीचा निकाल उद्या मंगळवार, 13 मे रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता हा निकाल नऊ विभागीय मंडळांच्या वेबसाइटवर पाहता येणार असल्याचे मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी आज स्पष्ट केले आहे.
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025मध्ये घेण्यात आली. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना मिळालेले गुण वेबसाइटवर पाहता येणार असून या माहितीची प्रिंटआऊटही घेता येणार आहे. तसेच mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती.
गुणपडताळणीसाठी 28 मेपर्यंत अर्ज करा
विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या प्रिंटआऊट ऑनलाइन घेता येणार असून मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवरून https://mahahsscboard.in येथे स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी 14 मे ते 28 मे 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येतील. तसेच ऑनलाइन पद्धतीने डेबिट कार्ड, व्रेडिट कार्ड, यूपीआय, नेट बँपिंगच्या माध्यमातून शुल्क भरता येणार आहे.
गुणसुधारसाठी तीन संधी
या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना ‘गुण/श्रेणी सुधार’/क्लास इप्रूव्हमेंट स्कीमअंतर्गत तीन संधी मिळणार आहेत. यामध्ये जून-जुलै 2025, फेब्रुवारी/मार्च 2026 आणि जून-जुलै अशा या संधी मिळतील. तर जून-जुलै 2025 मध्ये घेण्यात येणाऱया दहावीच्या पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार व खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱया विद्यार्थ्यांसाठी 15 मेपासून विद्यार्थ्यांना वेबसाइटवर अर्ज करता येणार आहेत.
दहावीचा निकाल टार्गेट लार्ंनग व्हेंचर्सच्या संकेतस्थळावर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सहकार्याने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे निकाल पाहण्याची सुविधा टार्गेट लार्ंनग व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल https://results.targetpublications.org/ या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल.
इथे पहा निकाल
झेड परिणाम.डिगिलॉकर. gov.in
z sscresult.mahahsscboard.in
z sscresult.mkcl.org
झेड परिणाम.टार्जेटपब्लिकेशन्स.ऑर्ग
z reals.navneet.com
z www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-exams
झेड एज्युकेशन.इंडियन एक्सप्रेस
z www.indiatoday.in/education-today/results
z www.aajtak.in/education/board-exam-sults
Comments are closed.