भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानने काय गमावले?

100 दहशतवादी, 11 वायुतळ अन् प्रतिष्ठा

ऑपरेशन सिंदूरसंबंधी भाजपने सोमवारी मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय सशस्त्र दलांनी दाखविलेला पराक्रम आणि अदम्य साहस हा 100 वर्षांपर्यंत आठवणीत ठेवला जाईल. सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेत दहशतवाद्यांचे अ•s नेस्तनाबूत करत देशाच्या जनतेला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. या अभियानात पाकिस्तानने केवळ 100 हून अधिक दहशतवाद्यांना गमाविले नसून त्याचे 11 मोठे दहशतवादी अ•sही ढिगाऱ्यात ऊपांतरित झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानने स्वत:ची प्रतिष्ठाही गमाविली असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

जगाने पाहिले भारतीय सैन्याचे शौर्य

22 एप्रिल ते 7 मेपर्यंत देशात आक्रोशाचे वातावरण होते. पुलवामा सारख्या हल्ल्याची पुनरावृत्ती यावेळी पहलगाममध्ये झाली, या हल्ल्यात 26 निर्देष नागरिकांना जीव गमवावा लागला. पंतप्रधान मोदींनी या पार्श्वभूमीवर हल्ल्यात सामील अन् कट रचणाऱ्यांना मातीत गाडू असे स्पष्ट केले होते. ऑपरेशन सिंदूरमध्ये तिन्ही संरक्षण दलांनी उत्तम ताळमेळ दाखवत पाकिस्तान आणि पीओकेत असलेले जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीनच्या 9 अ•dयांना ध्वस्त केले असल्याचे पात्रा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकारांना संबोधित करताना म्हटले.

पाकिस्तानने स्वत:ची प्रतिष्ठा गमाविली

ऑपरेशन सिंदूरद्वारे दहशतवादाचे अ•s नष्ट करण्यात आले, तसेच यामुळे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर पाकिस्तानला शरमेने मान खाली घालावी लागली. पाकिस्तानची कृष्णकृत्यं यामुळे जगासमोर आली. भारतीय डीजीएमओंनी स्वत: पत्रकार परिषद घेत या ऑपरेशनविषयी पूर्ण माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि सैन्याच्या अदम्य साहसाने हे अशक्य कार्य शक्य करून दाखविले असल्याचे पात्रा म्हणाले.

सैन्यदलांचे आभार

भाजप, पक्षकार्यकर्ते आणि देशाचे नागरिक सुरक्षा दलांचे आभार मानत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुमारे 20 देशांच्या प्रमुखांशी थेट चर्चा केली. पाकिस्तानला एकाकी कसे पाडले जावे यावर ही चर्चा केंद्रीत होती. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या सर्व देशांनी भारताला समर्थन दर्शविले. सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, अमेरिका यासारख्या मोठ्या देशांनी भारताला स्वत:चे पूर्ण समर्थन दर्शविले असा दावा भाजप नेत्याने केला आहे.

अण्वस्त्रसज्ज देशावर प्रहार

पहिल्यांदाच एखाद्या अण्वस्त्रसज्ज देशाला प्रत्युत्तर देण्यात आले. अशाप्रकारची कारवाई यापूर्वी कधीच झाली नव्हती. ऑपरेशन सिंदूरद्वारे आमच्यासाठी काहीच दूर नाही हे शत्रूला कळविले आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील दहशतवादी अ•s नष्ट केले. पाकने स्वप्नातही असे घडेल असा विचार केला नव्हता असे पात्रा यांनी म्हटले आहे.

दहशतवादी अड्डा नष्ट

ऑपरेशन सिंदूरमध्ये नष्ट झालेल्या 9 पैकी 5 दहशतवादी अ•s पीओकेत तर 4 पाकिस्तानातील होते. यातील मुरिदके अन् बहावलपूर सारखे दहशतवादी अ•s कुख्यात होते. हे दोन्ही अ•s दहशतवादी प्रशिक्षण, कट्टरवाद फैलावणे आणि शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणांची मोठी केंद्रं होती. येथूनच लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांचे नेतृत्व केले जात होते. या ऑपरेशनमध्ये मारले गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये रौफ असगरही सामील असून तो जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा नातेवाईक होता, तसेच आयसी-814 विमान अपहरण प्रकरणी वाँटेड होता, असे पात्रा यांनी म्हटले आहे.

Comments are closed.