दुसर्या भूकंपाने पाकिस्तानला धडक दिली
वृत्तसंस्था / .नवी दिल्ली
पाकिस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला आहे. राष्ट्रीय भूकंपमापन केंद्राच्या माहितीनुसार या भूकंपाची क्षमता 4.6 रिष्टर इतकी आहे. या भूकंपाचे क्षेत्र पाकिस्तानातील बलुचिस्तात प्रांतात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या भूकंपाचा सर्वाधिक परिणाम क्वेट्टा शहरात आणि आसपासच्या परिसरात जाणवला.
गेल्या चार दिवसांमध्ये पाकिस्तानात बसलेला हा दुसरा भूकंपाचा धक्का आहे. 9 मे ला 4.00 रिष्टर क्षमतेचा धक्का बसला होता. त्या भूकंपाचे केंद्रही बलुचिस्तानमध्येच होते. पाकिस्तान हा देश भारतीय आणि युरेशियन भूस्तराच्या सीमारेषेवर असल्याने पाकिस्तानला नेहमीच हा धोका असतो. पाठोपाठ दोन धक्के बसल्याने, पाकिस्तानात सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
रोमसाठी 10 किमी.
भूगर्भात 10 किलोमीटर खोल अंतरावर हा भूकंप झाल्याने त्याच्यामुळे फारशी जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचे वृत्त आहे. मात्र, क्वेट्टा शहरातील काही घरे पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच काही घरांच्या काचा फुटल्या असून काही लोक जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पाकिस्तान प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा कार्यरत केली असल्याचे समजते.
Comments are closed.