India’s official stance is that terrorism and the governments that feed it are not separate
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
नागपूर : ऑपरेशन सिंदूरची कारवाई झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण दहशतवाद्यांना पोसणारं सरकार आणि दहशतवाद्यांचे म्होरके यांना वेगळं मानणार नाही, असे स्पष्ट केले. याचपार्श्वभूमीवर आता माध्यामांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईवर 26/11 चा हल्ला झाला, तेव्हाच दहशतवाद आणि त्यांना पोसणारे आका अर्थात तेथील सरकार यांना वेगळे मानू नका, अशी मागणी आपण जगापुढे केली होती. पण, आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात भारताने ती आपली अधिकृत भूमिका म्हणून जाहीर केली असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. (India’s official stance is that terrorism and the governments that feed it are not separate)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केल्यानंतर नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन ‘न्यू नॉर्मल’ आज सांगितले. कुठलीही दहशतवादी कारवाई हा भारतावरचा हल्ला मानण्यात येईल आणि त्याला तितकेच ठोस उत्तर दिले जाईल. कोणतेही ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेल’ आम्ही कदापिही सहन करणार नाही तसेच दहशतवादी आणि त्यांना पोसणारे आका म्हणजे पाकिस्तानचे सरकार यांना वेगळे पाहणार नाही. या तिन्ही बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण, दरवेळी दहशतवादी हल्ला झाला की, पाकिस्तानचे सरकार आमचा दहशतवादाशी काही संबंध नाही, असा जगासमोर कांगावा करीत होते. पण, आता तसे होणार नाही. आज भारताने आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे जगापुढे मांडली आहे.
हेही वाचा – Modi Warning To Pakistan : दहशतवाद्यांचे सरकार आणि म्होरक्यांचा उल्लेख करत मोदींचे पाकला तीन इशारे
मुख्यमंत्री म्हणाले की, भारताने पंजाब प्रांतांत जाऊनही कशाप्रकारे ऑपरेशन केले, हेही पंतप्रधानांनी आज सांगितले. पाकिस्तानने घाबरून भारताला फोन केला आणि शस्त्रसंधी मागितली, हेही त्यांनी सांगितले. भारताने ऑपरेशन सिंदूर हे किती ताकदीने, शक्तीने, संयमाने आणि अचूकतेने राबविले, हे त्यातून दिसून येते. मी भारतीय सैन्यदलाचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि मोदींनाही धन्यवाद देतो. आता केवळ पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होईल, हेही पंतप्रधानांनी आपल्या संबोधनातून स्पष्ट केले आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा – Politics : शरद पवारांचा अजितदादांना कानमंत्र! सहकारच्या मेळाव्यात राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा
Comments are closed.