Aditya Thackeray criticizes Donald Trump saying that PoK is a bilateral issue not Kashmir
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या विरोधक मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही काश्मीर मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तान आणि पाकव्याक्त काश्मीरच्या 9 तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. उभय देशांनी एकमेकांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले सुरू केले होते. पण अमेरिकेच्या कथित हस्तक्षेपानंतर दोन्ही देशांत शस्त्रसंधी झाली. महत्त्वाचे म्हणजे यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या विरोधक मोदी सरकारवर टीका करताना दिसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही काश्मीर मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Aditya Thackeray criticizes Donald Trump saying that PoK is a bilateral issue not Kashmir)
आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करताना म्हटले की, “मला आशा आहे की, आज भारत सरकार जगाला हे स्पष्ट करेल की, काश्मीर कोणत्याही चर्चेचा भाग नाही. काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि तो नेहमीच राहील. तसेच काश्मीर हा आंतरराष्ट्रीय मुद्दा नाही आणि अगदी द्विपक्षीय मुद्दाही नाही. पण पीओकेचा भाग हा नक्कीच द्विपक्षीय मुद्दा आहे. कारण तो प्रदेश भारताचा भाग आहे आणि तो भारताला परत करावा लागेल, अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवली आहे.
I hope today it is made clear to the world by the Govt of India that Kashmir is not a part of any discussions.
Kashmir is an integral part of 🇮🇳 and will always be.
It is NOT an international issue, not even a bilateral issue.
The only thing bilateral about it is the area…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 12, 2025
काय म्हणाले होते ट्रम्प?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम झाल्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी आणखी एक ट्वीट करताना म्हटले होते की, भारत आणि पाकिस्तान यांच्या नेतृत्वाचा मला अभिमान वाटतो. जर युद्ध असेच सुरू राहिले असते, तर लाखो लोकांचा बळी गेला असता. अनेक निष्पाप लोक मृत्यूमुखी पडले असते आणि मोठा विनाश झाला असता. तसेच मला अभिमान आहे की, अमेरिकेच्या मदतीने भारत आणि पाकिस्तानमध्ये एक ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेण्यात आला. यानंतर आता मी दोन्ही देशांसोबत व्यापर वाढवण्यावर भर देणार आहे. याशिवाय दोन्ही देशांमध्ये काश्मीर समस्येवरही तोडगा काढणार आहे. यासाठी मी दोन्ही देशांसोबत काश्मीर मुद्यावरही चर्चा करणार आहे. हजारो वर्षानंतर काश्मीर मुद्यावर तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे मी चर्चा करेल. देव भारत आणि पाकिस्तानच्या नेतृत्वाला चांगल्या कामासाठी आशिर्वाद देवो, असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते.
हेही वाचा – Bacchu Kadu : नेहमीचं दुखणं बंद करण्यासाठी पाकिस्तान भारतात घ्या; बच्चू कडूंचे वक्तव्य चर्चेत
Comments are closed.