Uddhav Thackeray Raj Thackeray : उद्धव ठाकरे सकारात्मक मात्र राज ठाकरेंच्या पुढाकाराची प्रतीक्षा?

आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याची उत्सुकता राज्याला आहे. महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरेंनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी वाद बाजूला ठेवायला तयार आहे असं म्हटल्यावर उद्धव ठाकरेंकडूनही सकारात्मक प्रतिसाद आला. मात्र त्यानंतर दोन्ही ठाकरेंकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दोन्ही ठाकरे बंधू मधल्या काळात परदेश दौऱ्यावर होते. तिथून ते परत आलेत.  एकमेकांना टाळी दिली आता चर्चेचं पहिलं पाऊल कोण टाकणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागलीय. 

मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीच्या चर्चा नेमक्या कशा रंगल्या आणि त्यानंतर सध्या या चर्चा कशा थंड बस्त्यात गुंडाळल्या गेल्या पाहूया

 ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना मनसे नेते संदीप देशपांडेंनी युतीची शक्यता फेटाळून लावली…राज ठाकरेंच्या मुलाखतीचा अर्थ युती होतो असा नाही, असं संदीप देशपांडे म्हणालेत…मुलाखतीचा कुणी कसा अर्थ काढावा हा त्यांचा लोकशाहीनं दिलेला अधिकार असल्याचंहील देशपांडे म्हणालेत…राज ठाकरेंच्या मुलाखतीतून युती होईल असा संदेश जात नाही, असंही संदीप देशांपांडेंनी स्पष्ट केलंय…राज ठाकरेंनी सुरूवात केली, आम्ही फक्त सकारात्मक प्रतिसाद दिला, असं संजय राऊत म्हणाले होते…

Comments are closed.