Pahalgam Terrorists- कश्मीरमधील चौकात पहलगाम दहशतवाद्यांचे पोस्टर लावले, माहिती देणाऱ्याला 20 लाखांचे बक्षीस

जम्मू-कश्मीरमधील पहलगाममध्ये 26 पर्यटकांची निर्घृण हत्या करणारे दहशतवाद्यांना अद्याप सुरक्षा दलांनी पकडलेले नाही. आता कश्मीरमध्ये पोलिसांनी भिंतींवर या दहशतवाद्यांचे पोस्टर चिकटवले आहेत. दक्षिण काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी पोलिसांनी 3 वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर चिकटवले आहेत. हे दहशतवादी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी होते. त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. हल्ला केल्यानंतर हे दहशतवादी दक्षिण काश्मीरच्या घनदाट जंगलात लपून बसले आहेत असे मानले जाते.
पोलिसांनी लावलेल्या पोस्टरमध्ये दहशतवादी आदिल हुसेन, अली आणि हाशिम हातात बंदुका घेऊन दिसत आहेत. हे तिघे जिथे दिसतील तिथे तातडीने माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी लोकांना केले आहे.
पोस्टरमध्ये काय लिहिले आहे
फोटोमध्ये दिसणारे लोक काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत. या दहशतवाद्यांना शोधण्यात किंवा पकडण्यात मदत करणाऱ्यांना 20 लाख रुपयांचे बक्षीस मिळेल. त्यांना लपवणाऱ्या किंवा मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. माहिती देणाऱ्यांना 20 लाख रुपये किंवा त्याहून अधिक बक्षीस मिळेल.
माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक:
8491871831- 7408425711
कश्मीरमधील शांतता बिघडवणारे दहशतवादी देशाचे आणि मानवतेचे शत्रू आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
Comments are closed.