विराटलाही रोहितसोबत घ्यायची होती कसोटीतून निवृत्ती..! पण…
भारताचा दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने (Virat Kohli) सोमवारी (12 मे) रोजी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (Virat Kohli Retired From Test Cricket) तर याच्या 5 दिवस आधी, म्हणजेच (7 मे) रोजी भारताला 2 आयसीसी ट्राॅफी जिंकवून देणारा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटला निरोप दिला होता. आता एका वृत्तानुसार विराट देखील (7 मे) रोजी रोहितसोबत कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार होता पण त्याला वाट पाहण्यास सांगण्यात आले.
36 वर्षीय विराट कोहलीने 20 जून 2011 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याच्या 14 वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत त्याने 123 सामने खेळले. यामध्ये त्याने 46.85च्या सरासरीने 9,230 धावा केल्या. चाहत्यांना अपेक्षा होती की तो या फॉरमॅटमध्ये 10,000 चौथा फलंदाज बनेल पण त्याआधी निवृत्ती घेतली. विराटने कसोटीत 30 शतकांसह आणि 31 अर्धशतके झळकावली आहेत.
चाहत्यांना अपेक्षा होती की इंग्लंड दौऱ्यावर होणाऱ्या कसोटी मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असेल, परंतु त्याने अचानक निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले. यानंतर, बातमी आली की विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्ती घेणार असल्याचे बीसीसीआयला सांगितले आहे. 5 दिवसांनंतर, विराटने त्याची निवृत्तीची पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर करताना माहिती दिली. आता असे उघड झाले आहे की विराट देखील (7 मे) रोजीच रोहितसोबत ही पोस्ट शेअर करणार होता परंतु त्याला वाट पाहण्यास सांगण्यात आले होते, कारण त्याच दिवशी ऑपरेशन सिंदूर सुरू झाले होते आणि भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला होता.
‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार, विराट (7 मे) रोजी सोशल मीडियावर आपली निवृत्ती जाहीर करू इच्छित होता. त्याने बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबद्दल माहिती दिली होती परंतु त्यांनी कोहलीला काही दिवस वाट पाहण्यास सांगितले. कारण भारतीय सैन्याने आदल्या रात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले होते. भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
वृत्तानुसार, शनिवारी, (10 मे) रोजी भारत-पाकिस्तान युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर, कोहलीने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना सांगितले की आता तो लवकरच चाहत्यांना त्याच्या निवृत्तीबद्दल माहिती देईल. यादरम्यान त्याने (12 मे) रोजी कसोटीतून निवृत्ती जाहीर केली.
Comments are closed.