Kitchen : या टिप्सने द्या किचनला मॉडर्न आणि ट्रेंडी लूक

किचन हा घराचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. किचनमध्ये स्वयंपाक बनवला जातो. कुटूंबाचे आरोग्य याच किचनवर अवलंबून असते. त्यामुळे किचन स्वच्छ आणि सुंदर असणे महत्त्वाचे असते. आजकाल घरातील इतर खोल्याप्रमाणेच किचनचे इंटिरियर बनवून घेतात. तुम्हालाही तुमच्या किचनला स्वस्तात मस्त असा मॉडर्न आणि ट्रेंडी लूक द्यायचा असेल तर ही बातमी शेवटपर्यत वाचावी. आज आम्ही तुम्हाला किचनला मॉडर्न आणि ट्रेंडी लूक देण्यासाठी काय करावे यासंदर्भात काही टिप्स देणार आहोत, ज्याद्वारे किचनमध्ये स्वयंपाक करताना कोणतीही गैरसौय होणार नाही आणि किचन सुंदर दिसू शकेल.

टिपा –

  • जर किचन कॅबिनेटमध्ये तळाशी जागा असेल तर तेथे तुम्ही छोटासा बॉक्स बनवू शकता, जेणेकरून तुम्हाला वेगळा डस्टबिन ठेवावा लागणार नाही.
  • किचनला आकर्षक लूक देण्यासाठी रंगीबेरंगी जार, आर्टिफिशियल फ्रूट्स, वेजिटेबल बास्केट्सचा वापर करता येईल.
  • किचनमध्ये हात पुसण्यासाठी आपण नॅपकिन्सचा वापर करतो. हे नॅपकिन्स तुम्ही रंगीबेरंगी आणलीत तर होल्डरला लावलेले नॅपकिन्स किचनला एक सुंदर लूक देतील.
  • मॉडर्न लूकसाठी कॉट्रास्ट टाइल्सचा वापर करता येते.
मॉड्यूलर किचन कल्पना
  • टाइल्सप्रमाणे वरचे फ्लोरिंग सुद्धा आकर्षक करता येईल. तुमच्या ट्रॉलीला मॅच होईल असा रंग निवडावा.
  • स्मार्ट स्टोरेज दिल्याने किचनला ट्रेंडी लूक मिळतो.
  • बरण्या आणि डबे एकाच स्टाइल किंवा रंगाचे ठेवावेत. एकसारख्या डब्ब्यांमुळे घर खूप आकर्षक दिसते.
  • किचन ट्रॉलीला खूप वर्ष एकच रंग असेल तर तो तुम्ही बदलू शकता. हल्ली रंगापेक्षा वॉलपेपर बाजारात उपलब्ध आहेत. हे वॉलपेपर वॉटर किंवा ऑइलप्रुफ वॉलपेपर असतात, त्यामुळे त्यावर डाग जरी पडले तरी स्वच्छ करता येतात.

हेही पाहा –

https://www.youtube.com/watch?v=iiar-s-bctq

Comments are closed.