नाथाभाऊ शरद पवारांची साथ सोडणार? अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चांवर एकनाथ खडसे स्पष
Eknath Khadse : माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar), डॉ. सतीश पाटील (Satish Patil) या मातब्बर नेत्यांसह त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची (NCP Sharad Pawar Faction) साथ सोडत अजित पवार गटात (NCP Ajit Pawar Faction) सामील झाल्याने शरद पवार गटाला जळगावमध्ये (Jalgaon) मोठा धक्का बसला आहे. यानंतर जळगावातील आणखी काही मातब्बर नेते अजित पवार गटात जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या देखील नावाची चर्चा सुरु आहे. आता यावर खुद्द एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
एकनाथ खडसे म्हणाले की, अजित दादांच्या गटामध्ये जळगावातील काही नेतेमंडळी गेली. ज्या लोकांना जायचे होते ते गेले, ज्यांना नाही जायचे ते आमच्या सोबत राहिले आहेत. यानंतर आता आणखी काही नेते अजित पवार गटात जातील असे मला वाटत नाही. आम्ही आता शरद पवार (Sharad Pawar) साहेबांसोबत आहोत.
शरद पवारांसोबतच राहणार : एकनाथ खडसे
आज तरी असा कुठलाही गट अजित पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता नाही. चर्चांना काहीच अर्थ नाही. ज्यावेळेस अजित दादा पवार यांचा गट वेगळा झाला, त्याच वेळी ज्यांना जायचे होते ते सर्व आमदार अजितदादा गटात सामील झाले. त्या कालखंडात मला देखील निरोप देण्यात आला होता की, तुम्ही अजितदादा पवार गटात या. परंतु, त्यावेळेस देखील मी अजित पवार गटात गेलो नाही. मी शरद पवार साहेबांसोबतच राहिलो आणि आताही पवार साहेबांसोबतच राहणार आहे, असे त्यांनी म्हटले.
पवार साहेबांचे निर्देशच आपल्यासाठी अंतिम
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, शरद पवार जे निर्णय घेतील, त्यानुसार माझाही निर्णय असेल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सर्व चर्चांकडे लक्ष न देता, पक्ष विस्तार कसा होईल यावर भर द्यावा. पवार साहेबांचे निर्देशच आपल्यासाठी अंतिम असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. एकनाथ खडसे यांच्या या भूमिकेमुळे ते शरद पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
इतर महत्त्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Comments are closed.