Bjp new list of 58 district presidents announced in the state in marathi


BJP District Presidents : मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने भाकरी फिरवली आहे. भाजपने मंगळवारी 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती जाहीर केली. भाजपचे प्रदेश निवडणूक अधिकारी आमदार चैनसुख संचेती यांनी याबाबतची घोषणा केली. मुंबईतील सहा संघटनात्मक जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यांत अध्यक्ष नेमण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हाध्यक्ष निवडीत भाजपने अन्य पक्षातून आलेल्या नेत्यांवर जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. (bjp new list of 58 district presidents announced in the state)

महाराष्ट्र भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल करण्यात आले असून भाजपाने नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर केली आहेत. राज्यातील मंडळ आणि तालुका अध्यक्षांच्या नेमणुकीनंतर भाजपने जिल्हाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबईत राज्यातील 36 जिल्ह्यात एकूण 58 जिल्हाध्यक्षांची निवड जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई जिल्हाध्यक्षपदासाठी 3 पदे तयारी करण्यात आली आहे. उत्तर मुंबई, उत्तर पूर्व मुंबई आणि उत्तर मध्य मुंबईसाठी जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर करण्यात आली असून अनुक्रमे दीपक तावडे, दीपक दळवी आणि विरेंद्र म्हात्रे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. राज्यसभा सदस्य धैर्यशील पाटील यांची रायगड दक्षिण, संदीप लेले यांची ठाणे शहर तर जितेंद्र डाकी यांची ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा – Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर आणि शस्त्रसंधीनंतर देशातील वातावरण काय…नवीन सर्व्हे काय सांगतो

भाजपचे अन्य जिल्हाध्यक्ष : सिंधुदुर्ग : प्रभाकर सावंत, रत्नागिरी उत्तर : सतीश मोरे, रत्नागिरी दक्षिण : राजेश सावंत, रायगड उत्तर: अविनाश कोळी, भिवंडी : रविकांत सावंत, मिरा- भाईंदर : दिलीप जैन, नवी मुंबई : डॉ. राजेश पाटील, कल्याण :नंदू परब, उल्हासनगर : राजेश वधारिया

पुणे शहर : धीरज घाटे, पुणे उत्तर (मावळ) : प्रदीप कंद, पिंपरी -चिंचवड शहर : शत्रुघ्न काटे, सोलापूर शहर: रोहिणी तडवळकर, सोलापूर पूर्व:, शशिकांत चव्हाण, सोलापूर पश्चिम : चेतनसिंग केदार, सातारा: अतुल भोसले, कोल्हापूर पूर्व (हातकणंगले) : राजवर्धन निंबाळकर, कोल्हापूर पश्चिम (करवीर) : नाथाजी पाटील, सांगली शहर : प्रकाश ढंग, सांगली ग्रामीण : सम्राट महाडिक

नंदूरबार: नीलेश माळी, धुळे शहर : गजेंद्र अंपाळकर, धुळे ग्रामीण: बापू खलाने. मालेगाव : नीलेश कचवे, जळगांव शहर : दीपक सूर्यवंशी, जळगाव पूर्व : चंद्रकांत बाविस्कर, जळगाव पश्चिम: राध्येश्याम चौधरी, अहिल्यानगर उत्तर : नितीन दिनकर, अहिल्यानगर दक्षिण : दिलीप भालसिंग

नांदेड महानगर: अमर राजूरकर, परभणी महानगर : शिवाजी भरोसे, हिंगोली : गजानन घुगे, जालना महानगर :भास्करराव मुकुंदराव दानवे, जालना ग्रामीण : नारायण कुचे, छत्रपती संभाजीनगर उत्तर : सुभाष शिरसाठ, छत्रपती संभाजीनगर पश्चिम : संजय खंबायते, धाराशिव : दत्ता कुलकर्णी

बुलढाणा : विजयराज शिंदे, खामगांव :सचिन देशमुख, अकोला महानगर : जयवंतराव मसणे, अकोला ग्रामीण : संतोष शिवरकर, वाशिम : पुरुषोत्तम चितलांगे, अमरावती शहर: डॉ. नितीन धांडे, अमरावती ग्रामीण (मोरणी): रविराज देशमुख, यवतमाळ: प्रफुल्ल चव्हाण, पुसद: डॉ. आरती फुफाटे, मेळघाट : प्रभुदास भिलावेकर, नागपूर महानगर : दयाशंकर तिवारी, नागपूर ग्रामीण (रामटेक): अनंतराव राऊत, नागपूर ग्रामीण (काटोल) : मनोहर कुंभारे, भंडारा : आशू गोंडाने, गोंदिया : सीता रहागंडाले





Source link

Comments are closed.